• Download App
    चूक झाली क्षमा करा!!; राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा अखेर माफीनामा!! sorry for the mistake!!; Governor Bhagat Singh Koshiyari's final apology

    चूक झाली क्षमा करा!!; राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा अखेर माफीनामा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईतून जर गुजराती आणि राजस्थानी गेले तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी उरणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. sorry for the mistake!!; Governor Bhagat Singh Koshiyari’s final apology

    माझ्याकडून चूक झाली क्षमा करा असे म्हणत त्यांना वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

    परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास बाळगतो, असे त्यांनी म्हटले आहे.

    काय म्हणाले होते राज्यपाल?

    कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी केले होते.

    sorry for the mistake!!; Governor Bhagat Singh Koshiyari’s final apology

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    jayant patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार; शरद पवारांशी चर्चा करून 2 दिवसांत राजीनाम्याची शक्यता

    महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला; ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!