• Download App
    लवकरच नागपूर फ्लाइंग क्लब येथे प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात होणार : विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्माSoon the actual pilot training will start at Nagpur Flying Club: Divisional Commissioner Prajakta Lavangare-Verma

    लवकरच नागपूर फ्लाइंग क्लब येथे प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात होणार : विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

    नागपूर फ्लाइंग क्लब येथे प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती.Soon the actual pilot training will start at Nagpur Flying Club: Divisional Commissioner Prajakta Lavangare-Verma


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे ‘डीजीसीए’च्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची पूर्तता केल्यामुळे वैमानिक प्रशिक्षणाला मान्यता मिळाली असल्याची माहिती नागरी विमान उड्डयण महासंचालनालयाची मान्यता मिळाली आहे.

    त्यामुळे आता लवकरच नागपुरात वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तसेच नागपूर फ्लाइंग क्लबच्या अध्यक्षा प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली आहे.वैमानिक प्रशिक्षण सुरू झाल्यामुळं स्थानिकांना प्रशिक्षणासाठी बाहेर जावे लागणार नाही. ही सुविधा प्राप्त झाल्यानं युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

    नागपूर फ्लाइंग क्लब येथे प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती.दरम्यान नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची पूर्तता करण्यात आली असून वैमानिक प्रशिक्षणाला ही मान्यता मिळाली आहे.



    तसेच विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी नागपूर फ्लाइंग क्लबला प्रशिक्षणासाठी तसेच फ्लाइंग क्लब नव्याने सुरु करण्यासाठी डीजीसीएचे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठातर्फे मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

    वैमानिक प्रशिक्षणासाठी 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत मान्यता

    नागपूर फ्लाइंग क्लब येथे 2017पासून वैमानिक प्रशिक्षण बंद होते.दरम्यान नवी दिल्ली येथील नागरी विमान उड्डयण महासंचालनालयतर्फे वैमानिक प्रशिक्षणासाठी 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत मान्यता देण्यात आली आहे.

    उप मुख्य उड्डाण निर्देशक हे पद भरणार

    प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ मनुष्यबळ तसेच क्लबकडे असलेले सेसना ही चारही विमाने सज्ज करण्याच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात आले होते. तसेच उप मुख्य उड्डाण निर्देशक हे पद भरण्यासाठी उच्च न्यायालयाकडून विशेष परवानगी घेण्यात आली. त्यानुसार आवश्यक असलेली सर्व पदांची भरती करण्यात आली असून विमानांची फिटनेस व मेन्टनन्स लायसन्स प्राप्त झाल्यानंतर नागरी विमान उड्डयण महासंचालनालयातर्फे प्रशिक्षणासाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.

    Soon the actual pilot training will start at Nagpur Flying Club: Divisional Commissioner Prajakta Lavangare-Verma

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!