प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्य शाहीर कवी गोविंद यांच्या कविता संग्रहाची पाचवी आवृत्ती लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. यासह त्यांच्या चरित्राचे, त्यांच्या काव्याच्या समीक्षेचे, वैशिष्ट्य विवेचनाचे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने येत्या २६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी प्रकाशित करण्यात येणार आहे. Soon release of the fifth edition of the poetry collection of freedom poet Govind
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी आणि भारता च्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये हे प्रकाशन होणार आहे. हे पुस्तक सुमारे ४०० पृष्ठांचे असून पुस्तकाची किंमत ४०० रुपये इतकी असणार आहे. प्रकाशनपूर्व नोंदणी (शनिवार, दि. २६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत) केल्यास पुस्तकाचे मूल्य २५० रुपये इतके असेल तर हाताळणी आणि पाठवणी यासाठी अतिरिक्त मूल्य राहील.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९२२००७०३८६ किंवा लँडलाईन (०२२) २४४६५५८७७ येथे संपर्क साधावा. ईमेल- savarkarlibrary19@gmail.com येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सोबत माहितीपत्र जोडले आहे, ते पाहावे.
Soon release of the fifth edition of the poetry collection of freedom poet Govind
महत्त्वाच्या बातम्या
- शिवतीर्थावर लतादीदींचे स्मारक : भाजप आमदार राम कदमांची मागणी; संजय राऊतांची “वेगळी” प्रतिक्रिया!!
- लताजींना आदरांजली : राज्यसभेचे कामकाज तासभरासाठी तहकूब, आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान उत्तर देणार
- धर्म संसदेतील अतिरेकी वक्तव्यांबाबत डॉ. मोहन भागवत असहमत; सावरकरांच्या हिंदुत्वात देशाच्या एकात्मतेची धारणा!!