• Download App
    2019 अजितदादांच्या बंडाला सुरुंग लावणाऱ्या सोनिया दुहान यांचे आता सुप्रिया सुळेंवर शरसंधान!! Sonia Duhan fires solvo at supriya sule

    2019 अजितदादांच्या बंडाला सुरुंग लावणाऱ्या सोनिया दुहान यांचे आता सुप्रिया सुळेंवर शरसंधान!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 – 9 नऊ जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत तेवढ्या जागा जिंकणे तर दूरच, हातात उरलेल्या पक्षाच्या संघटनेत बंडाचे एकाचढ एक झेंडे उंच फडकायला लागले आहेत. 2019 मध्ये अजित पवारांबरोबर फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांना हरियाणातल्या हॉटेलमधून बाहेर काढून पुन्हा मुंबईत आणून शरद पवारांसमोर हजर करणाऱ्या फायर ब्रँड नेत्या सोनिया दुहान यांनी आता थेट सुप्रिया सुळे यांच्यावरच शरसंधान साधले आहे. Sonia Duhan fires solvo at supriya sule

    शरद पवारांच्या कन्या म्हणून सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण त्या आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. सुप्रिया सुळे यांच्या भोवतीचे नेते आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विरोधात कट कारस्थाने करतात, असा आरोप सोनिया दुहान यांनी केला. सोनिया दुहान यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या आरोपामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या.

    सोनिया दुहान यांनी माध्यमांसमोर येऊन सुप्रिया सुळे यांच्याविरोधात धक्कादायक वक्तव्य केलं. सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बून शकल्या नाहीत. सुप्रिया सुळे यांच्या बाजूचे लोक कारस्थान रचत आहेत. नेत्यांना पक्षातून हटवण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे मी लवकरच शरद पवार गट सोडणार असल्याचे सोनिया दुहान यांनी सांगितले.



    “सर्व लोक म्हणजे मी असेल, धीरज शर्मा सारखे लोक असतील, आमच्या सर्वांसाठी शरद पवार हे नेते होते, आहेत आणि कायम राहतील. आमची पूर्ण निष्ठा शरद पवारांवर आहे, पण आमच्या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा खूप सन्मान आहे. शरद पवार यांच्या कन्या म्हणून त्यांचा आदर आहे. पण सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत, जे शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत, ते लोक निर्णय घेत आहेत आणि पक्ष सोडून जात आहेत, असा दावा सोनिया दुहान यांनी केला.

    “मी आजपर्यंत पक्ष सोडलेला नाही. पण मी खूप लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे. मी दुसरा कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही. तुम्हाला वाटेल की, मी उद्या अजित पवार गट, भाजप किंवा काँग्रेस पक्षात जाईन, तर तसं नाही. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी सध्या कोणताच निर्णय घेणार नाही. मी सध्या एकनिष्ठ आहे. सुप्रियाताईंच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचं काम करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचं, हटवण्याचं आणि मजबूर करण्याचं काम करत आहेत.”

    सोनिया दुहान कोण आहेत?

    सोनिया दुहान या हरियाणाच्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) विद्यार्थी संघटना अध्यक्षा आहेत. सोनिया दुहान यांची ओळख राष्ट्रवादीतल्या लेडी जेम्स बॉन्ड म्हणून आहे. जेव्हा एकनाथ शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीहून गोव्यात मुक्कामी आले, तेव्हा त्यांच्याशी संपर्क करणायासाठी सोनिया दुहान आणि इतर 3 पदाधिकारी गोव्यातल्या हॉटेलमध्ये शिरले होते, पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.

    अजित पवारांच्या पहाटेच्या बंडाच्या वेळी नरहरी झिरवाळांसह राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना दिल्लीजवळच्या गुरुग्रामधल्या एका हॉटेलमध्ये ठेवलं गेलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, त्या हॉटेलबाहेर पहाऱ्यासाठी भाजपचे 150 कार्यकर्ते होते. त्या हॉटेलमध्ये धुडगूस घालून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना पुन्हा मुंबईत आणणाऱ्या सोनिया दुहानच होत्या.

    Sonia Duhan fires solvo at supriya sule

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस