• Download App
    जावईबापूंचे गुजरातपेक्षा महाराष्ट्र वर प्रेम अधिक; राष्ट्रवादीचा जुना बालेकिल्ला पिंपरी - चिंचवड मध्ये अजितदादांची अमित शाहांवर स्तुतिसुमने!!|Son-in-law loves Maharashtra more than Gujarat

    जावईबापूंचे गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर प्रेम अधिक; राष्ट्रवादीचा जुना बालेकिल्ला पिंपरी – चिंचवड मध्ये अजितदादांची अमित शाहांवर स्तुतिसुमने!!

    विशेष प्रतिनिधी

    चिंचवड : अजित पवारांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याबरोबर व्यासपीठ शेअर करून त्यांच्यावर स्तुतीची जोरदार पुष्पवृष्टी केली. अमित शाह हे गुजरातचे असले तरी महाराष्ट्राचे जावई आहेत आणि त्यांचे गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे, अशा शब्दांत अजितदादांनी त्यांचे कौतुक केले. या कौतुकाला अमित शहा यांच्यासह चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात असलेल्या सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी टाळ्या वाजवून दाद दिली.Son-in-law loves Maharashtra more than Gujarat

    सहकारिता पोर्टल उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमातले अजितदादांचे भाषण गाजत आहे. महाराष्ट्रात नेहमी ठाकरे बंधू आणि कधीतरी शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर गुजरातचा पक्षपात करण्याचा आरोप करतात. या तिन्ही नेत्यांच्या आरोपाला अजित पवारांनी परस्पर उत्तर देऊन टाकले. अमित शाह हे गुजरातचे असले तरी त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम अधिक आहे. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय तयार करावे यासाठी आम्ही 22 वर्षे प्रयत्न करत होतो. परंतु ते धाडस आधीच्या सरकारांना दाखवता आले नाही. हे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दाखवले. म्हणूनच आपण त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा एवढा मोठा निर्णय घेतला, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.



    मोदींच्या धडाकेबाज निर्णयांचे कौतुक करताना अजित दादा यांनी मोदींची जवानांबरोबरची दिवाळी महाराष्ट्राला दिलेल्या विविध योजना यांची आठवण करून दिली. आजच पंतप्रधानांनी देशातल्या 504 रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन केले. त्यात आकुर्डी, दौंडसह महाराष्ट्रातील 44 स्थानके 2025 पर्यंत पूर्णपणे नूतनीकरण झालेली असतील, याकडे अजितदादांनी आवर्जून लक्ष वेधले. देशात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रह आणि सहकार मंत्री अमित शाह हेच नेतृत्व देऊ शकता ही बाब अजितदादांनी अधोरेखित करून सांगितली.

     पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्लात परत

    पण त्या पलीकडे जाऊन अजित दादांनी एक महत्त्वाचे स्थानिक राजकारण साधून घेतले, ते म्हणजे आपल्या जुन्या बालेकिल्ल्यात पिंपरी चिंचवड मध्ये ते राजकीयदृष्ट्या परतले. पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादा सुमारे 10 ते 15 वर्ष राजकारणातले “दादा” होते. काँग्रेसचे नेते रामकृष्ण मोरे यांचे वर्चस्व म्हणून अजितदादांनी तिथे स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले होते.*

     फडणवीसांनी फोडला होता बालेकिल्ला

    परंतु 2014 नंतर पिंपरी चिंचवडचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला देवेंद्र फडणवीस यांनी कॉन्सन्ट्रेशन करून फोडला. अनेक मोहरे भाजपमध्ये घेऊन अजितदादांच्या वर्चस्वाखालच्या पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यातून भाजपच्या ताब्यात आणली. तिथे पाच वर्षे भाजपचा महापौर बसवून दाखवला. त्यामुळे राष्ट्रवादीचा पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला उध्वस्त झाला होता. त्या बालेकिल्ल्यात आज अजित पवारांनी अमित शहा यांची स्तुती करत पुनर्प्रवेश केला आहे आणि हे अजितदादांच्या स्थानिक राजकारणाचे वैशिष्ट्य आहे. बाकी अजितदादांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची केलेली स्तुती ही दादांची राजकीय अपरिहार्यता आहे.

    Son-in-law loves Maharashtra more than Gujarat

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!