विशेष प्रतिनिधी
परभणी : माझ्या मुलाला कसलाही आजार नव्हता हे सर्व खोटं आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने मारहाण करण्याचे आदेश दिले आणि ज्यांनी मारहाण केली त्यांना जन्मठेप द्या, अशी मागणी परभणी येथे कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई वत्सला सूर्यवंशी यांनी केली आहे. Somnath Suryavanshi
परभणी प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला राज्य सरकारने आज दहा लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे. यानंतर आम्हाला ही मदत मान्य नाही अशी प्रतिक्रिया सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने दिली आहे. त्या म्हणाल्या, मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे मान्य नाही, माझ्या मुलाचा मारहाण करुन जीव घेतला आहे. मला दहा लाख रुपयांची गरज नाही आम्हाला न्याय पाहिजे.
अजितदादांना भाजपच्या सत्तेची वळचण हवी; पण संघ मुख्यालयातला बौद्धिक कार्यक्रम नको!!
देवेंद्र फडणवीसांनी बोललेलं पूर्ण चुकीचे आहे. आम्ही गरीबांची मुलांनी शिक्षण घ्यावे की गुन्हेगारीच्या मार्गाने जावं हे फडणविसांनी सांगितले आहे. लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशीचा भाऊ अविनाश सूर्यवंशी याने दिली आहे.
Somnath Suryavanshi had no disease, then how did he die, asked the mother
महत्वाच्या बातम्या
- Kulgam : कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 5 दहशतवादी ठार
- Mukesh Rajput : भाजपचे दोन खासदार पायऱ्यांवरून पडले; मुकेश राजपूत आयसीयूमध्ये दाखल, सारंगींवरही उपचार सुरू
- Shivraj Singh Chouhan : ‘राहुल गांधी विरोधी पक्षनेते होण्याच्या लायक नाहीत’, शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल!
- Good News : कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार!