वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई – गोवा क्रूज रेव्ह पार्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई करून बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यातली एक प्रतिक्रिया आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.Someone will put a punch in your pocket and arrest you …, people say; Pawar questions the credibility of the Narcotics Bureau
केंद्रीय यंत्रणांची सध्याची कामगिरी अशी आहे, की लोक बोलतात… कुणी तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करतील सांगता येत नाही, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर सीबीआय सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडी या केंद्रीय तपास संस्थांच्या विश्वासार्हतेवर देखी त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या संस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांची संबंधित साखर कारखान्यांवर तसेच अन्य संस्थांवर कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केंद्रीय तपास संस्थांच्या एकूण कारभारावर वक्तव्य केले आहे. तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांनी पाहुणचार जरूर घ्यावा. हवा तो तपास करावा. पण अजीर्ण होईपर्यंत कोणाचा पाहुणचार घेऊ नये, अशा शब्दात पवारांनी तपास संस्थांची खिल्ली उडवली.
शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु त्यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे बदली झालेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे स्वतः गायब आहेत.
असे पूर्वी कधीही घडलेले नव्हते. परमवीर सिंग कुठे आहेत याचा तपास पोलीस आणि केंद्रीय संस्था घेत आहेत याची आठवण शरद पवार यांनी करून दिली. अनिल देशमुख यांचा ठावठिकाणा नेमका कोठे आहे याबाबत मात्र त्यांनी काही भाष्य केले नाही.
Someone will put a punch in your pocket and arrest you …, people say; Pawar questions the credibility of the Narcotics Bureau
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारच्या तुघलकी निर्णयाने नाट्यकर्मी संतप्त, 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करून काय उपयोग?
- आर्मी इंटेलिजन्सच्या लेफ्टनंट कर्नल महिलेने केली आत्महत्या, पुण्यात सुरू होते ट्रेनिंग
- अमित खरे यांची पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून नियुक्ती
- एलआयसीची खास योजना ; एकदा प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला मिळणार आयुष्यभर पेन्शन