• Download App
    केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही दिव्यांग पदोन्नती 4 % आरक्षण लागू; सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविणार|Solar Agriculture Channel will implement Yojana 2

    केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही दिव्यांग पदोन्नती 4 % आरक्षण लागू; सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविणार

    प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू कर करण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाने घेतला आहे. आज झालेल्या बैठकीत विविध निर्णय झाले. ते खालील प्रमाणे :Solar Agriculture Channel will implement Yojana 2



    शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ राबविणार. सन २०२५ पर्यंत ३० % वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा

    पुनर्जीवित किंवा पुनरर्चित साखर कारखाना, सूतगिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमणार. सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा

    महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) उपकंपनी स्थापणार. मागास, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणार

    राज्यातील अकृषि विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी

    आता बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थांना विद्यावेतन मिळणार

    ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

    खुल्या गटातील महिलांकरता आरक्षण पदावरील निवडीकरता खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक नाही

    पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करणे व पदे निर्माण करण्यास मान्यता.

    अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक पदनिर्मितीस मान्यता.

    पुणे पालिका हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम तसेच दुरुस्तीपोटी फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय

    मराठी भाषा भवनाच्या सुधारित आराखड्याचे सादरीकरण. मंत्रिमंडळाची मान्यता

    Solar Agriculture Channel will implement Yojana 2

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे निधन

    राज्याची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची पण राज्य कुठेही दिवाळखोरीकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    निलंबित टीएमसी आमदार हमायून कबीर एआयएमआयएम सोबत आघाडीची घोषणा; बंगाल निवडणुकीत ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचा दावा