• Download App
    Solapur: Father Booked For Religious Conversion Bribe सोलापुरात धर्मांतरासाठी महिलांना पैशांचे आमिष; फादरवर गुन्हा दाखल

    Solapur : सोलापुरात धर्मांतरासाठी महिलांना पैशांचे आमिष; फादरवर गुन्हा दाखल

    Solapur

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : Solapur सोलापुरात एका फादरने महिलांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फॉर्मवर सही केल्यास दहा हजार रुपये देण्याचे आमिष देण्यात आले. याप्रकरणी त्या फादरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Solapur

    काय घडले नेमके?

    सोलापुरातील सेटलमेंट परिसर, वांगी रोड, भूषण नगर भाग १ येथे ही घटना घडली. रवी फादर (वय ५५) असे संबंधित फादरचे नाव असून, ते गेल्या ९ वर्षांपासून त्या भागात राहत आहेत. त्यांनी आपल्या घरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये एक लहान चर्च उभारले होते.Solapur



    प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी प्रार्थना सभा आणि धार्मिक गाणी होत असत. शेजारी राहणाऱ्या महिलांना ते सातत्याने चर्चमध्ये यायला सांगत आणि ख्रिश्चन धर्माविषयी बोलत.

    महिलांवर दबाव, पैशांचे आमिष

    २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता, संगीता कैलाश रजपूत या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलांसोबत घरासमोर बसल्या होत्या. त्यावेळी फादर त्या ठिकाणी आले आणि महिलांना म्हणाले-
    “तुमचे देव काही कामाचे नाहीत. ते तुम्हाला कधीही मदत करणार नाहीत. ते पाण्यात टाका आणि आमच्या देवाचा स्वीकार करा. मी एक फॉर्म देतो, त्यावर सही करा. सही केल्यास प्रत्येकी १०,००० रुपये मिळतील.”

    त्यांनी महिलांना लाल रंगाचे पेय पिण्यास आणि ब्रेड खाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला, जे ख्रिश्चन धर्मातील धार्मिक विधींसारखे होते.

    पोलिसांत तक्रार, गुन्हा नोंद

    या घटनेबाबत संगीता कैलाश रजपूत यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रवी फादर यांच्याविरुद्ध धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आणि आमिष दाखवल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    या प्रकरणामुळे सोलापुरात खळबळ उडाली असून, धार्मिक दबाव आणि आर्थिक आमिषावरून धर्मांतराच्या घटनांकडे प्रशासन अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांनी धैर्याने तक्रार केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

    पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

    Solapur: Father Booked For Religious Conversion Bribe

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मनोज जरांगेंच्या तोंडी सरकार उलथवण्याची भाषा; ते विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार देणार होते त्याचे काय झाले??

    Supriya Sule : मांसाहाराच्या वक्तव्यावरून भाजपची सुप्रिया सुळेंवर टीका, आचार्य तुषार भोसले म्हणाले- असे विधान निव्वळ मूर्खपणा

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका, मतदारयाद्या तपासण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना