सामाजिक सुरक्षा विभागाने हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकला. दोन्ही ठिकाणांवरील प्रत्येकी सात असे मिळून १४ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. Social security Department raided gambaling place in Hadapsar and lonikalbhor area
विशेष प्रतिनिधी
पुणे : सामाजिक सुरक्षा विभागाने हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकला. दोन्ही ठिकाणांवरील प्रत्येकी सात असे मिळून १४ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय ४० हजारांवर ऐवज जप्त करण्यात आला. फुरसुंगीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका आणि सोरट अड्डयावर पथकाने छापा टाकला. त्यावेळी सातजण जुगार खेळत असल्याचे दिसून आले.
दादासाहेब तुपे (रा. फुरसुंगी ), प्रफुल्ल मोहन कामठे (वय ३५ चांभळी सासवड), किरण भैरु चव्हाण (वय २९ रा. हरपळे वस्ती), दिपक ललन निसाद (वय २५ रा. कोढंवा), विलास शरनाप्पा चौगुले (वय ४८ रा. फुरसुंगी), प्रकाश तानाजी हरपळे (वय ३३), भीमा किसन कदम (वय ६० रा. फुरसुंगी) यांना अटक केली. त्यांच्याकडून २० हजारांचे जुगार साहित्य जप्त केले.
लोणी काळभोरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका जुगार अड्डयावर छापा टावूâन सामाजिक विभागाने सातजणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. युवराज (पुर्ण नाव नाही), संतोष बबन टकले, (वय २९) शमशुद्दीन मैनुद्दीन शेख (वय ५७) मोहन नागनाथ पोतू (वय ३३), अजय हिरामण चव्हाण (वय २६) लक्ष्मण जानू राठोड (वय ४८) इस्माईल मोहम्मद शेख (वय ५७) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून २० हजारांचा ऐवज जप्त केला.ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, प्रमोद मोहिते, आण्णा माने, बाबा कर्पे, मनीषा पुकाळे, यांनी केली.
Social security Department raided gambaling place in Hadapsar and lonikalbhor area
महत्त्वाच्या बातम्या
- कोकण चित्रपट महोत्सव – २०२२ रूपरेषा व पुरस्कार जाहीर
- Raj Thackeray : सभेपेक्षा जास्त चर्चा अटीशर्तींची; 15000 च्या गर्दीची…!!; पण यातले रहस्य काय…??
- हिंदीविरुध्द वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची उडी, बॉलीवुडवर साधला निशाणा
- समाज ठरवेल तोपर्यंतच सरकार राहू शकते, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
- मुंबई पोलीसांनी आपल्या नावावर बनावट एफआयआर केला दाखल, उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
- शेतकरी मेळाव्यांमध्ये अल्ला हू अकबरच्या घोषणा देणारे राकेश टिकैत यांचा भोंगे हटविण्याच्या मागणीला पाठिंबा