विशेष प्रतिनिधी
सातारा :– सातारा जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या किसन वीर साखर कारखान्यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारवाई केली नाही तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडे जावे लागेल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन काका पाटील यांनी केले आहे. … So, we have to go to Kirit Somaiya; Nitin Patil appeals to Co-operation Minister regarding action on Kisanveer factory
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत नितीन पाटील यांनी हे विधान करून खळबळ उडवून दिली आहे .
किसन वीर साखर कारखान्यावर सहकार मंत्री आणि सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पण, त्यांनी ती अजूनही केली नाही. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जावे लागणार आहे, असे मिश्किलपणे म्हणाले.
सातारा जिल्हा बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी नेते असलेले नितीन काका पाटील हे माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील यांचे सुपुत्र आहेत. तसेच वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत.
किसन वीर सहकारी साखर कारखान्यावर एक हजार कोटी पेक्षा ही जास्त कर्ज आहे. त्याचे कागदोपत्री पुरावे असल्याचे सांगताना ते म्हणाले, मदन भोसले यांनी या प्रकरणी एक तर राजकारणातून संन्यास घ्यावा की हिमालयात जावे, हे त्यांचे त्यांनी ठरवावे, असा उपरोधिक टोलाही नितीन काका पाटील यांनी लगावला आहे.
So, we have to go to Kirit Somaiya; Nitin Patil appeals to Co-operation Minister regarding action on Kisanveer factory
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला