• Download App
    ....म्हणून त्यांना हे प्रकरण वाढवायचं आहे, समीर वानखेडेंवरील आरोपांवरून देवेंद्र फडणवीसांची आघाडी सरकारवर टीका... So they want to escalate the case, Devendra Fadnavis criticizes the government over the allegations against Sameer Wankhede

    ….म्हणून त्यांना हे प्रकरण वाढवायचं आहे, समीर वानखेडेंवरील आरोपांवरून देवेंद्र फडणवीसांची आघाडी सरकारवर टीका

    राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे…. So they want to escalate the case, Devendra Fadnavis criticizes the government over the allegations against Sameer Wankhede


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आधी आर्यन खानची अटक आणि त्यानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप या मुद्द्यांवरून मोठा वाद आणि चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे. यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

    “नवाब मलिक यांचं दु:ख वेगळं आहे. पण अशा प्रकारे तपास अधिकाऱ्याला टार्गेट करणं योग्य नाही. ते संवैधानिक पदावर आहेत. रोज आरोप लावायचे, आपल्या सरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात टाकायचं. हे अयोग्य आहे. साक्षीदारांची विश्वासार्हता न्यायायलयाबाहेर समाप्त करण्याचा प्रयत्न झाला, तर कुठलीच केस टिकणार नाही”, असं ते म्हणाले.



     

    जात-धर्म काढणं हे अत्यंत दुर्दैवी

    समीर वानखेडेंच्या धर्माविषयी नवाब मलिक यांनी वारंवार आक्षेप घेतले. त्यामुळे फडणवीसांनी यावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की “एखादा तपास अधिकारी कारवाई करतो म्हणून त्याची जात-धर्म काढायचा हे दुर्दैवी आहे. शेवटी वानखेडेंच्या पत्नीला खुलासा करावा लागला.

    पुढे फडणवीस म्हणाले की , वानखेडे चुकले असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे हे मान्य आहे. पण हेतुपुरस्सर अधिकाऱ्याला टार्गेट करणं मान्य नाही. या प्रकरणात आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे एनसीबीच्या वरिष्ठांशी त्याची चौकशी करायला हवी”,

    हेच कारण आहे ; म्हणून राज्य सरकार हा वाद वाढवतंय?

    फडणवीस म्हणाले की आर्यन खान, समीर वानखेडे यांच्याबाबत राज्य सरकार विशिष्ट कारणासाठी वाद वाढवत आहेत. “ आघाडी सरकारची राज्यात इतकी प्रकरणं सुरू आहेत आणि इतक्या प्रकरणांमध्ये ते फसले आहेत, की त्यावरून त्यांना राज्याचं लक्ष हटवायचं आहे. म्हणून महाराष्ट्र सरकार हा वाद वाढवतंय”, असा आरोप फडणवीसांनी केला.

    … So they want to escalate the case, Devendra Fadnavis criticizes the government over the allegations against Sameer Wankhede

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस