• Download App
    .... म्हणून सरकारला अशा नकला कराव्या लागतात ; रावसाहेब दानवेंची खोचक टीका.... so the government has to make such imitations; Raosaheb Danve's sharp criticism

    …. म्हणून सरकारला अशा नकला कराव्या लागतात ; रावसाहेब दानवेंची खोचक टीका

    भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून आमनेसामने आले आहेत.तसेच एकमेकांवर आरोप करत आहेत….. so the government has to make such imitations; Raosaheb Danve’s sharp criticism


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षानं मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती सोबत अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडलं.त्यामुळे अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपाचा खेळ चांगलाच रंगलेला पहायला मिळाला. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभेत नक्कल केली. त्यावरून देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.



    दरम्यान रावसाहेब दानवे यांनी विधानसभेत मोदींची केलेली नक्कल आणि आणखी अनेक मुद्द्यांवरुन सरकारला चांगलच घेरलेलं आहे.यावेळी दानवे म्हणाले की, राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात विकासाची कामे केली नाही. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी त्यांना अशा नकला कराव्या लागत आहे, अशी बोचरी टीकाही केली.

    भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून आमनेसामने आले आहेत.तसेच एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यामुळे या पाच दिवसांच्या अधिवेशनात काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

    …. so the government has to make such imitations; Raosaheb Danve’s sharp criticism

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस