• Download App
    ...मग गोवारी किंवा मावळ येथील घटनेत आदेश मंत्रालयातून देण्यात आले होते का? फडणवीसांचा खडा सवाल! so in the incident at Gowari or Maval were the orders given from the ministry Fadnavis tough question

    …मग गोवारी किंवा मावळ येथील घटनेत आदेश मंत्रालयातून देण्यात आले होते का? फडणवीसांचा खडा सवाल!

    …तर मग उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अध्यादेश का काढला नाही? असाही सवाल विचारला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  जालना येथील अंतरावाली येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटेनेने राजकीय वातावरण तापलेले आहे. विरोधकांकडून सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेत विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. So in the incident at Gowari or Maval were the orders given from the ministry Fadnavis tough question

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले, ”जालना येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे. बळाचा वापर केल्याच्या घटनेचे समर्थन होऊच शकत नाही. मी मुख्यमंत्री असताना 2000 आंदोलने झाली, तेव्हाही बळाचा वापर कधीच झाला नाही. आता झालेल्या घटनेसंदर्भात शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. लाठीचार्जचे आदेश हे कधीच मंत्रालयातून जात नाहीत, ते एसपी स्तरावर होत असतात पण घाणेरडे राजकारण केले जात आहे.” तसेच, ”मग गोवारी किंवा मावळ येथील घटनेत आदेश मंत्रालयातून देण्यात आले होते का?”  असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

    याचबरोबर, ”मराठा आरक्षणाचा कायदा आपण तयार केला. उच्च न्यायालयात केवळ दोन कायदे टिकले. एक महाराष्ट्राचा आणि दुसरा तमिळनाडूचा. उच्च न्यायालयात टिकलेल्या कायद्याला सुप्रीम कोर्टात कधीच स्थगिती मिळत नाही. पण गेल्या सरकारने असे प्रताप केले की त्याला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली आणि पुढे त्यांच्याच काळात तो रद्द झाला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 4500 कोटींचे कर्ज, 504 अभ्यासक्रमांची प्रतिपूर्ती, यूपीएससी-एमपीएससी परिक्षेत शिष्यवृत्ती, 1015 कोटी रुपये सारथीसाठी दिले, महायुती सरकारनेच सर्व मोठे निर्णय घेतले. अन्य सरकारला त्यांचे निर्णय दाखविता येणार नाही.” असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

    याशिवाय, ”आमच्या काळात भरीव मदत दिल्यावर उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सर्व निर्णयांची अंमलबजावणी सुरू झाली. अधिसंख्य पदांवर उमेदवारांना नोकरीची मागणी उद्धव ठाकरे यांच्या काळात सुद्धा झाली. पण ती पूर्ण झाली नाही. ते काम सुद्धा आताच्या सरकारने केले आहे.  अध्यादेश काढून जर टिकणारे मराठा आरक्षण देता आले असते तर मग उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अध्यादेश का काढला नाही?” असा सवाल करत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

    so in the incident at Gowari or Maval were the orders given from the ministry Fadnavis tough question

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस