• Download App
    '....म्हणून मी महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद नाकारले' ; जयंत पाटलांनी सांगितला आर आर पटलांसोबतचा ' तो ' किस्सा'.... so I refused the post of Home Minister of Maharashtra'; Jayant Patel told the 'he' case with RR Patel

    ‘….म्हणून मी महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद नाकारले’ ; जयंत पाटलांनी सांगितला आर आर पटलांसोबतचा ‘ तो ‘ किस्सा

    स्वत: जयंत पाटील यांनी भाष्य करुन गृहमंत्रिपद का नाकारलं याचं कारण सांगितलं आहे.’…. so I refused the post of Home Minister of Maharashtra’; Jayant Patel told the ‘he’ case with RR Patel


    विशेष प्रतिनिधी

    सांगली : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यकष जयंत पाटील यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदाबाबत मोठा खुलासा केला आहे.सांगली जिल्हा पोलीस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्याकडून घेतलेल्या एका सल्ल्याचा किस्साही सांगितला.

    दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अजित पवार यांनी जयंत पाटलांनी गृहमंत्रिपद नाकारल्याची माहिती दिली होती. त्यावर आता स्वत: जयंत पाटील यांनी भाष्य करुन गृहमंत्रिपद का नाकारलं याचं कारण सांगितलं आहे.



    जयंत पाटील म्हणाले की ,”अजित पवारांनी मी गृहमंत्री पद न घेण्याबाबत जे काही सांगितलं ते खरं आहे.” तसेच, यावेळी जयंत पाटलांनी आर.आर.पाटील यांच्या समवेतील एक किस्साही सांगितला.

    आर.आर.पाटील यांच्या समवेतील तो किस्सा

    जयंत पाटील म्हणाले की, “२००९ साली आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानं गृहमंत्रीपद तुम्हाला सांभाळायचंय, असं मला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. त्यावेळी एका लग्नात गृहखातं कसं असतंय? हे आर. आर. पाटलांना विचारलं होतं. त्यावर आबांनी ( आर आर पाटील ) मला ब्लड प्रेशर आहे का? डायबिटीस आहे का? अस विचारल. त्यावर मी नाही म्हटल्यावर आबांनी मला गृहमंत्री व्हा, हे दोन्ही त्रास तुम्हाला सुरु होतील, असं म्हटल्याचं जयंत पाटील म्हणाले.

    पुढे जयंत पाटील म्हणाले की, गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरू होतो, हे मला आरआर(आबा) पाटील यांनी सांगितलं होतं. याच कारणामुळे मी गृहमंत्रिपद नाकारलं आहे.

    ‘…. so I refused the post of Home Minister of Maharashtra’; Jayant Patel told the ‘he’ case with RR Patel

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार