• Download App
    ....म्हणून भाजप अशा छोट्या नेत्यांना संधी देत ; रोहित पवारांची पडळकरांवर टीका... so BJP would give a chance to such small leaders; Rohit Pawar's criticism on Padalkar

    ….म्हणून भाजप अशा छोट्या नेत्यांना संधी देत ; रोहित पवारांची पडळकरांवर टीका

    पडळकरांनी जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यासह महाराष्ट्र पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत…. so BJP would give a chance to such small leaders; Rohit Pawar’s criticism on Padalkar


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आमदार गोपिचंद पडळकरांनी त्यांच्यावरती हल्ला झाल्याचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ट्विटद्वारे प्रसारीत केला आहे.तसंच आपण महाराष्ट्र सरकारने दिलेली सुरक्षा देखील नाकारत असल्याचही त्यांनी यावेळी जाहीर केलं असून शिवाय पडळकरांनी जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यासह महाराष्ट्र पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

    दरम्यान यावेळी पडळकरांच्या याच वक्तव्यावरती राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की , ‘२६ डिसेंबर रोजी हा व्हिडीओ समोर आला आणि असा हल्ला जर झालाच असेल तर त्याचा मी निषेधच करतो, पण या हल्ल्यामागे लोकांचा रोष का होता? हे बघण खूप महत्वाचं आहे. तसंच या व्हिडीओ प्रसारीत करण्यामागे राजकारण असेल तर हे चुकीचं आहे , अस देखील रोहित पवार म्हणले.


    अरे तू आमदार आहेस, तू तरी मास्क वापर, अजित पवार यांनी रोहित पवार यांचे कान उपटले


    पुढे रोहित पवार म्हणाले की , कुठल्याही आमदाराला सुरक्षा मिळतेच दरम्यान पडळकरांनी ती घेतली नाही हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे,.शिवाय एकत्रित बसून हा हल्ला का झाला याचा विचार व्हायला हवा. मग यावर भाजपचे मोठे नेते का कधी टीका करत नाहीत.कारण असे छोटे नेते जे असतात ज्यांना संधी अशा टीका करण्यासाठीच दिली जाते,त्यामध्ये पडळकर येतात की नाही हे त्यांच्या वक्तव्यावरुन कळतेच असा टोलाही त्यांनी पडळकरांना लगावला.

    … so BJP would give a chance to such small leaders; Rohit Pawar’s criticism on Padalkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना