विशेष प्रतिनिधी
मुंबई : काही वर्षांपूर्वी स्लमडॉग मिलेनिअर या झोपडपट्टीतील मुलांवरील चित्रपटाने ऑस्कर पटकावले होते. त्याच्यापेक्षाही प्रेरणादायी कथा मुंबईतील एका झोपडपट्टीतून पुढे आला आहे. शाहीना अत्तरवाला या झोपडपट्टीतील राहणाºया मुलीने मुंबईतील झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये प्रॉडक्ट डिझाईन मॅनेजर असा प्रवास केला आहे.Slum Millionaire Engineer, Slum Girl became Microsoft Product Designer
मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या शाहीना यांनी खूप मेहनत आणि चिकाटीने मायक्रोसॉफ्टसारख्या जगविख्यात कंपनीत नोकरी मिळवली आहे. नेटफ्लिक्सवरील बॅड बॉय बिलीनीयर्स: इंडियाया सिरीजमध्ये त्यांचं झोपडपट्टीतील घर दाखवल्यावर त्यांच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या. शाहीना यांची पोस्ट ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शाहीना अत्तरवाला मुंबईतील बांद्रा रेल्वे स्टेशनच्या जवळील दर्गा गल्लीमधील एका झोपडपट्टीत राहत. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जीवावर आज त्या मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट डिझाईन मॅनेजर पदापर्यंत पोहोचल्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीही त्यांना मिळत नसत.
स्वत:च्या मनाला मारून त्या संघर्ष करत होत्या. दर्गा गल्लीमध्ये सुविधांअभावी त्यांना रोडवरसुद्धा झोपावे लागले. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतली. मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळाल्यानंतर आता त्या संपुर्ण कुटूंबाची काळजी घेत आहेत.
Slum Millionaire Engineer, Slum Girl became Microsoft Product Designer
महत्त्वाच्या बातम्या
- एकाच पक्षाला कोर्टातून दिलासा कसा मिळतो? भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर संजय राऊत यांचा सवाल
- ADR Report : भाजपने 2019-20 मध्ये 4847 कोटींची संपत्ती जाहीर केली, इतर राजकीय पक्षांची काय आहे स्थिती? वाचा सविस्तर…
- दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक, ९ महिलांसह ११ आरोपी, दिल्ली पोलिसांची माहिती
- UP Election : भाजपची 91 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री योगींचे माध्यम सल्लागार शलभमणी यांना देवरियातून तिकीट