• Download App
    वानवडी परिसरात 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन रेल्वे कर्मचाऱ्यासह सहा रिक्षाचालकांना अटक|Six rickshaw drivers and two railway employees arrested for gang-raping a 13-year-old girl in Wanwadi area

    वानवडी परिसरात 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन रेल्वे कर्मचाऱ्यासह सहा रिक्षाचालकांना अटक

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: पुणे रेल्वे स्थानक परिसरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरणकरून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.Six rickshaw drivers and two railway employees arrested for gang-raping a 13-year-old girl in Wanwadi area

    याबाबत १३ वर्षीय पिडीत मुलीने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. पिडीत मुलगी ३१ ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात आली होती. रात्री तिला आरोपींनी आता गाडी नाही.



    तू गावी कशी जाणार असे म्हणत आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे सांगून बाहेर आणले. तिला वानवडी परिसरात नेले. त्याठिकाणी आरोपींनी रात्री तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एकूण ७ आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.

    हा प्रकार रविवारी उघडकीस आला. त्यानंतर वानवडी पोलीसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. यामध्ये रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इतर आरोपी रिक्षा चालक आहेत. त्यांना सहाय्य करणाऱ्यांचा देखील पोलीस शोध घेत आहेत. ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    Six rickshaw drivers and two railway employees arrested for gang-raping a 13-year-old girl in Wanwadi area

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस