• Download App
    पावसाळी अधिवेशनात सहा दिवस कामकाज, अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरुवात|Six days of work in Monsoon session, session starts from 17th August

    पावसाळी अधिवेशनात सहा दिवस कामकाज, अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरुवात

    प्रतिनिधी

    मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारामुळे रखडलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान होत असून प्रत्यक्ष कामकाज सहा दिवस होणार आहे. अधिवेशनाबाबत गुरुवारी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.Six days of work in Monsoon session, session starts from 17th August

    अधिवेशन काळात शुक्रवारी, १९ ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुटी आहे. शनिवार व रविवारच्या सुटीमुळे सलग तीन दिवसात कामकाज होणार नसल्याने अधिवेशन केवळ ६ दिवस चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे- फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असून पहिल्याच दिवशी अध्यादेश पटलावर ठेवण्यात येऊन सन २०२२-२०२३ च्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात येतील.



    १८ रोजी शासकीय कामकाज तर २२ आणि २३ ऑगस्ट रोजी पुरवण्या मागण्यांवर चर्चा होऊन मतदान घेण्यात येईल. बुधवार, २४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम तर शेवटच्या दिवशी शासकीय कामकाज घेण्यात येणार आहे.

    Six days of work in Monsoon session, session starts from 17th August

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !