वृत्तसंस्था
मुंबई : हिंदू सणांवर निर्बंध या विषयावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे – पवार सरकारवर टीकेची झोड उठवत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांची तुलना केली आहे. Situation in Mumbai is similar to that of West Bengal, where Durga Puja celebrations were restricted
पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रमाणे ममता बॅनर्जी यांच्या सरकारने दुर्गा पूजेवर बंधने आणली, परंतु बकरी ईद सारख्या सणांना मोकळीक दिली तसेच महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. गणेशोत्सव मंडळांवर निर्बंध आणले जातात. परंतु मंत्र्यांचे मोठे कार्यक्रम, पक्ष कार्यालयांची उद्घाटने याच्यात कोरोना प्रतिबंधक नियमावली पाळली जात नाही. तिथे निर्बंध लावले जात नाहीत, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात. परंतु ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सारखेच वर्तन करतात. हिंदू सणांवर निर्बंध लावतात. मुंबईत मेट्रोचे उद्घाटन, पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन या कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तेव्हा प्रचंड गर्दी झाली होती. बेस्टच्या कार्यक्रमांमध्ये मुंबईत गर्दी झाली. ती त्यांना चालली. परंतु हिंदू सण साजरे करताना मात्र निर्बंध आणायचे हे यांचे “हिंदुत्व” आहे, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.
नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गणेश मंडळांच्या काही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांची भेट घेतली. त्यांना गणेशोत्सवाच्या निर्बंधांची माहिती दिली. हे निर्बंध हटविण्याची मागणी केली. या भेटी संदर्भात नितेश राणे यांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्यपालांनी गणेश मंडळांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही ते म्हणाले.
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे नातू तेजस ठाकरे शिवसेनेचे विविअन रिचर्डस म्हणून राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्यावर प्रश्न विचारला असता नितेश राणे म्हणाले, त्यांच्या थोरल्या बंधूंनी बाळासाहेब ठाकरे यांचे काहीच गुण घेतले नाहीत. त्यामुळे निराशा झाली. परंतु तेजस ठाकरे यांनी बाळासाहेबांचा आवाज आणि दरारा घ्यावा अशी अपेक्षा आहे, असा टोला त्यांनी लगावला.
Situation in Mumbai is similar to that of West Bengal, where Durga Puja celebrations were restricted
महत्तवाच्या बातम्या
- टेरर फंडिंग प्रकरणात छापे; एनआयएने जम्मू-काश्मीरच्या 14 जिल्ह्यांमध्ये 45 ठिकाणी छापे घातले, फुटीरतावादी संघटना जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांची घरांची झडती
- MADE IN INDIA : मोदी है तो मुमकिन है ! स्वदेशी टॉय फॅक्ट्री 410 कोटींची गुंतवणूक ; 2024 पर्यंत भारतीय खेळणी उद्योग उलाढाल 200 अब्ज ; यासह हजारो रोजगार…
- FIH Ranking : Tokyo Olympic मधील ऐतिहासिक कामगिरीचं फळ ! भारतीय पुरुष हॉकी संघ तिसऱ्या स्थानावर तर महिला संघाची आठव्या स्थानावर उडी
- बकरी ईदवर निर्बंध न लादलेल्या केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी, मंदिरांमध्ये बाली तर्पणवर बंदी
- मोदी सरकारच्या TOPS पॉलिसीमुळे चमकू लागलेत भारतीय खेळाडू… काय आहे ही पॉलिसी…??