• Download App
    Santosh Deshmukh सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन

    Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन; आयपीएस बसवराज तेलींच्या नेतृत्वात 10 जणांची टीम

    Santosh Deshmukh

    विशेष प्रतिनिधी

    बीड : Santosh Deshmukh  बीड सरपंच हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. तसेच खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडला अटक देखील करण्यात आली आहे. वाल्मीक कराडला आता 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचसोबत आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. शासनाकडून आता आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.Santosh Deshmukh

    आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ही समिती स्थापन करण्यात आली असून तेली यांच्यासह 10 जणांची टीम या घटनेचा सखोल तपास करणार आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता लवकारात लवकर तपास लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाल्मीक कराडला काल रात्री केज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.



    सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात शासनाकडून एसआयटी नेमण्यात आली आहे. यात आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली (भा.पो.से.), पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी, पुणे अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाकडून या घटनेचा संपूर्ण तपास करण्यात येणार आहे.

    या प्रकरणाच्या तपासासाठी 10 जणांची एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. यात आयपीएस बसवराज तेली, पोलिस उप अधीक्षक अनिल गुजर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलिस हवालदार मनोज वाघ, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलिस नाईक बाळासाहेब अहंकारे, पोलिस शिपाई संतोष गित्ते, असे या अधिकाऱ्यांचे नाव आहे.

    SIT formed in Sarpanch Santosh Deshmukh murder case; 10-member team led by IPS Basavaraj Teli

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात