• Download App
    सिंहगड एक्स्प्रेस आजपासून मुंबई- पुणेकरांच्या सेवेत दाखल, १९ महिन्यांपासून बंद होती ही रेल्वे । Sinhagad Express enters Mumbai-Pune service from today, this train has been closed for 19 months

    सिंहगड एक्स्प्रेस आजपासून मुंबई- पुणेकरांच्या सेवेत दाखल, १९ महिन्यांपासून बंद होती ही रेल्वे

    • आजपासून ही गाडी मुंबई व पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.प्रवाशांना लवकरच आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. Sinhagad Express enters Mumbai-Pune service from today, this train has been closed for 19 months

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मुंबई महा मार्गावर सिंहगड एक्स्प्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती.ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती.ती आजपासून सुरू झाली आहे. आज स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटीला घालून स्वागत केले.आजपासून ही गाडी मुंबई व पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.प्रवाशांना लवकरच आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

    ही रेल्वेगाडी ( क्र ०१००९) पुण्यावरून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी निघाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी पोहचेली.



    ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकावर थांबेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी ( क्र ०१०१० ) सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी निघेल आणि रात्री १० वाजता पुण्यात पोहचेल. ही माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे व मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबईला ये-जा करण्यासाठी ही गाडी महत्वाची आहे. यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

    Sinhagad Express enters Mumbai-Pune service from today, this train has been closed for 19 months

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस