• Download App
    शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सिंगल डिजिट उमेदवार यादी येणार संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर!!|Single digit candidate list of Sharad Pawar's NCP will come on the occasion of Sankashti Chaturthi!!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सिंगल डिजिट उमेदवार यादी येणार संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शरद पवार आणि कुठलाही धार्मिक मुहूर्त यांचे नाते अहि – नकुलाचे आहे, मांसाहार केल्यामुळे ते पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात आत मध्ये न जाता बाहेरूनच दर्शन घेऊन आणि सत्कार स्वीकारून परत गेले होते. पण आता त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची यादी मात्र संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर बाहेर येणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी ही गुरुवारी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर 28 मार्चला जाहीर होणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.Single digit candidate list of Sharad Pawar’s NCP will come on the occasion of Sankashti Chaturthi!!



    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर लढणार, असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. अर्थात यापैकी एक जागा वंचित बहुजन आघाडीला सुटली, तर पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी 9 म्हणजे सिंगल डिजिटच जागा लढणार आहे.

    पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या बारामती, माढा, शिरुर, सातारा, बीड, वर्धा, रावेर, अहमदनगर, भिवंडीसह 10 जागांवर लढवणार असल्याचे जयंत पाटलांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस आहे. तरी इकडे महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांची राष्ट्रवादी  आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे आपले उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत बुधवारी दुपारी 3.00 वाजता एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा करणार आहेत. त्यामुळे कोणाला कुठून उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दुसरीकडे सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील जागेचा तिढा कायम आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या दुपारी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पुन्हा एकदा बैठक होणार असूश त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत, असे सांगितले जात आहे.

    Single digit candidate list of Sharad Pawar’s NCP will come on the occasion of Sankashti Chaturthi!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!