म्हणाले मला इतर पुरस्कारांपेक्षा” माझी ही ” अचीव्हमेंट माझ्या साठी खूप महत्त्वाची ” गप्पाष्टक या कार्यक्रमात या दिग्गज संगीतकाराची हजरी.. Singer musician Salil kulkarni
विशेष प्रतिनिधी
पुणे : डॉक्टर सलील कुलकर्णी संगीत क्षेत्रातलं सध्याचं आघाडीचं नाव. 700 हुन अधिक संगीतबद्ध केलेली गाणी, संगीत क्षेत्रातील हिमालयाप्रमाणे दिग्गज असणाऱ्या भारतरत्न लता दीदी आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काम. अनेक रियालिटी शोचं परीक्षण, दोन सिनेमे, दोन पुस्तक या सगळ्यांसोबतच कवितेवर शब्दावर प्रेम करतं गेली वीस वर्ष आयुष्यावर बोलू काही यासारखा कविता आणि गाण्यांचा आगळावेगळा प्रयोग करणारे डॉक्टर सलील कुलकर्णी आणि त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून मिळालेले असंख्य पुरस्कार.
हा सगळा ऐवज नावावर असताना देखील. डॉक्टर सलील कुलकर्णी यांना एका होतंकरू गायकाचे पालक म्हणून,जो मानसन्मान मिळतो. तो या सगळ्यांपेक्षा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असं मत डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक या कार्यक्रमात व्यक्त केलं.
पालकत्व ही संधी म्हणून घ्या. देवाने तो खूप मोठा आशीर्वाद दिला आहे. असं समजून त्याच्याकडे बघा ओझं म्हणून बघू नका. आणि आपल्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत आपल्या पाल्यांना सहभागी करून घ्या. असा मोलाचा सल्ला सलील कुलकर्णी यांनी या मुलाखतीत दिला.
गप्पा,किस्से,आठवणी, आणि अर्थातच गाणी या सगळ्यांनी नटलेली ही मुलाखत
माणूस म्हणून समृद्ध करून जाते. या मुलाखतीत डॉ.सलील कुलकर्णी यांनी त्यांचा आजवरचा संगीत क्षेत्रातील प्रवास, त्यांचं कवितेवर आणि शब्दावर असलेलं प्रेम , लतादीदींसोबत केलेलं काम आणि आयुष्यावर बोलू काही या त्यांच्या वीस वर्षे पूर्ण होत असलेल्या कार्यक्रमाबाबत आणि किस्से आणि आठवणी गप्पाष्टक च्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. ट्रॉलर्स या नव्याने उगवलेल्या प्रजातीबद्दल देखील डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी आपल्या मुलाखतीत चांगल्या प्रकारे कमेंट केली आहे. ही मुलाखत तुम्हाला द फोकस इंडियाच्या youtube चॅनल वर बघता येणार आहे.
Singer musician Salil kulkarni with gappashtak
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल यांच्या सरकारी बंगल्याचे कॅग ऑडिट करणार; नूतनीकरणासाठी 53 कोटी रुपये खर्च, एलजींनी गृह मंत्रालयाला केली होती शिफारस
- आदिपुरुषवर अलाहाबाद हायकोर्ट म्हणाले- दरवेळी हिंदूंच्या सहिष्णुतेची परीक्षा कशाला? नशीब, त्यांनी कायदा मोडला नाही!
- पुतीनविरोधात बंड होणार हे अमेरिकेला माहिती होते, रिपोर्टमध्ये दावा- त्यांनी हे नाटोपासूनही लपवले
- काश्मीरमध्ये १५ दिवसांत ११ पाकिस्तानी दहशतवादी ठार; ५५ किलो ड्रग्ज अन् मोठ्याप्रमाणात शस्त्रंही जप्त!