• Download App
    Siddhant Kapoor Drugs Probe ANC Mephedrone Mohammed Saleem Shakti Kapoor Photos Videos Report 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सिद्धांत कपूरची 5 तास चौकशी

    Siddhant Kapoor : 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सिद्धांत कपूरची 5 तास चौकशी

    Siddhant Kapoor

    वृत्तसंस्था

    मुंबई : Siddhant Kapoor  २५२ कोटी रुपयांच्या ‘मेफेड्रोन’ ड्रग्ज जप्ती प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद सलीम उर्फ मोहम्मद सुहैल शेख याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे, अभिनेता-दिग्दर्शक सिद्धांत कपूर यांची मंगळवारी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षासमोर (एएनसी) ५ तास चौकशी केली गेली. सिद्धांत हा ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा पुत्र आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे.Siddhant Kapoor

    मुख्य आरोपी मोहम्मद सलीम सुहैल शेख याला गेल्या महिन्यात दुबईतून भारतात आणण्यात आले आहे. चौकशीदरम्यान शेख याने दावा केला होता की, बॉलीवूड, फॅशन जगतातील काही व्यक्ती, एका राजकारण्यासह कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या एका नातेवाईकानेही भारत आणि परदेशात त्याने आयोजित केलेल्या रेव्ह पार्ट्यांमध्ये सहभाग घेतला होता. या दाव्यांच्या पुष्टीसाठी एएनसीने सिद्धांत कपूर यांना समन्स बजावले होते . सिद्धांतला यापूर्वी २०२२ मध्ये बंगळूरू येथे मादक पदार्थांचे सेवनप्रकरणी ताब्यात घेतले होते.Siddhant Kapoor



    एएनसीने सिद्धांत कपूरला विचारले हे प्रश्न

    अभिनेता सिद्धांत कपूरची घाटकोपरच्या एएनसी कार्यालयात चौकशी झाली. मुख्य आरोपी मोहम्मद सलीम शेख उर्फ ‘लविश’ शी असलेल्या संबंधांवर एएनसीने प्रश्नांची जंत्रीच सादर केली.
    आरोपी सलमान सलीम शेख याच्याशी ओळख कधी झाली?
    पहिली भेट कधी आणि कुठे?
    गेल्या ५ वर्षांत दुबईला किती वेळा गेलात?
    या प्रवासांमागे काय कारण होते आणि तिथे कोणाला भेटलात?
    दुबईत आयोजित कोणत्याही ड्रग्ज पार्टीत तुमचा सहभाग होता का?
    मुंबईतील कोणकोणत्या अभिनेत्यांची भेट झाली?
    तुम्ही कधी ड्रग्जचे सेवन केले आहे का?
    कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या टोळीतील ताहिर डोला (सलीम डोलाचा मुलगा) याला भेटलात का?
    शेख किंवा डोला यांच्या खात्यातून तुमच्या खात्यात कधी पैशांचे व्यवहार झाले आहेत का?

    चौकशी झालेले मोठे चेहरे

    सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात एनसीबीने दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान व रकुल प्रीत सिंह यांच्यासह अनेक बड्या अभिनेत्रींची चौकशी केली होती; परंतु त्यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस आरोप सिद्ध झाले नाहीत, तसेच त्यांना अटकही झाली नाही.

    Siddhant Kapoor Drugs Probe ANC Mephedrone Mohammed Saleem Shakti Kapoor Photos Videos Report

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai BMC : मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख मतदारांची दुबार नावे; प्रारूप मतदार यादी जाहीर

    Dr Gauri Palve-Garje : पालवे कुटुंबीयांचा गंभीर आरोप- गौरीची हत्याच; लेकीला न्याय मिळावा, सीबीआय चौकशीची मागणी

    जामखेड मध्ये निधी आला प्रचंड, पण एकमेकांचे पाय खेचण्याच्या नादात जनतेचे नुकसान; एकनाथ शिंदेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल