नाशिक : श्यामची आई 71 वर्षानंतरही दिल्लीत सुपरहिट राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत पुन्हा फिट!!, असे आज घडले. साने गुरुजींच्या श्यामच्या आईने 71 वर्षांपूर्वी 1954 मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्ण कमळ पटकावले होते 2025 मध्ये पुन्हा एकदा श्यामची आईने दिल्लीत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पदक पटकावले. साने गुरुजींची श्यामची आई अशा तऱ्हेने दिल्लीत 71 वर्षांनंतरही सुपरहिट ठरली. Shyamchi aai
साने गुरुजींच्या श्यामची आई या आत्मकथनाच्या आधारावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी 1953 मध्ये मराठी मध्ये श्यामची आई याच नावाने मराठी चित्रपट बनविला होता. त्यामध्ये माधव वझे यांनी श्याम, तर वनमाला यांनी श्यामच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील प्रवचनकाराची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यावेळी महाराष्ट्रात सुपरहिट ठरलाच होता, पण 1954 मध्ये पहिल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात श्यामच्या आईने राष्ट्रपतींचे सुवर्णकमळ पटकावले होते.
भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात मराठी माणसाने केली होती, तर पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारावर देखील मराठीच माणसाने मोहोर उमटवली होती.
– अश्रूंनी लिहिलेली गाणी
त्यानंतर 2025 च्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये श्यामची आई या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार पटकावला. सुजय डहाके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या सिनेमात संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भुतकर, शर्व गाडगीळ आदींनी या चित्रपटात भूमिका केली.
साने गुरुजींनी अश्रूंनी लिहिलेली आईची कहाणी अशा शब्दांमध्ये स्वतः आचार्य अत्रे यांनी श्यामच्या आई कथानकाचे वर्णन केले होते. ते कथानक चित्रपट रूपाने प्रेक्षकांसमोर आणणे हे मोठे आव्हान होते पण आचार्य अत्रे यांनी ते आव्हान पेलून साने गुरुजींच्या श्यामच्या आईला भारतीय चित्रपट सृष्टीच्या भूमीवर प्रस्थापित केले होते.
– संस्कार मूल्य निर्मळ
काळ पुढे सरकला देश काल परिस्थिती बदलली, तरी श्यामच्या आईची गोष्ट इतिहास जमा झाली नाही. ती ताजीच राहिली. तिच्यातले संस्कार मूल्य कधी मलीन झाले नाही ते टवटवीतच राहिले. 2025 मध्ये सुद्धा सुजय डहाके यांच्यासारख्या प्रतिभान दिग्दर्शकाला श्यामच्या आईने पुन्हा आव्हान दिले. त्यांनी हे आव्हान चांगले पेलले. या सिनेमात त्यांनी त्यांच्या आईच्या संस्कारांच्या बरोबर साने गुरुजींच्या संस्कारांचा आणि संघर्षाचा वस्तूपाठही जगासमोर आणला. आज याच चित्रपटावर राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराची मोहर उमटली. श्यामची आई 71 वर्षांनंतरही दिल्लीत सुपरहिट ठरली.
Shyamchi aai cinema bags National award again after 71 years
महत्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे संसदेतील संपूर्ण भाषण; काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले- इतकी चर्चा करा की शत्रू घाबरेल!
- जगातल्या कुठल्याही नेत्याने Operation Sindoor थांबवायला सांगितले नाही; डोनाल्ड ट्रम्पच्या 25 दाव्यांना मोदींचा एकच फटका
- Bihar SIR : बिहारमध्ये SIR वर तूर्त बंदी नाही; SCने ECला विचारले- आधार कार्ड व मतदार ओळखपत्र का समाविष्ट करत नाही?
- Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, थरूर म्हणाले – मौन व्रत; संसदेत काँग्रेसच्या विचारसरणीवर बोलण्यास नकार दिल्याची चर्चा