• Download App
    उमेदवारी मिळवण्यात श्रीकांत शिंदे "यशस्वी"; संभाजीनगरचा शिंदे सेनेचा तिढा सुटला; पण पवार मात्र अजूनही सातारा - माढ्यात उमेदवाराच्या शोधात!! Shrikant Shinde succeeded in regaining his candidature in Kalyan

    उमेदवारी मिळवण्यात श्रीकांत शिंदे “यशस्वी”; संभाजीनगरचा शिंदे सेनेचा तिढा सुटला; पण पवार मात्र अजूनही सातारा – माढ्यात उमेदवाराच्या शोधात!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महायुतीतल्या जागावाटपाच्या ठेचा ठेचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण मधली आपली उमेदवारी पुन्हा मिळवण्यात यशस्वी झाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत एकनाथ श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यांना विक्रमी बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला. Shrikant Shinde succeeded in regaining his candidature in Kalyan

    दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतला आणि भाजप मधला छत्रपती संभाजी नगरच्या जागेचाही तिढा सुटला. तेथे राज्याचे मंत्री संदिपान भुमरे यांना मामा तुम्हीच लढा, असे सांगून एकनाथ शिंदे यांनी त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले. त्यामुळे संभाजीनगर मध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिंदे सेनेचे मंत्री संदिपान भुमरे आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या तिरंगी लढत होणार आहे.



    एकीकडे महायुती मधले तिढे टप्प्याटप्प्याने सुटत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात मात्र अजून उमेदवारांची शोधाशोधच सुरू आहे. शरद पवारांना साताऱ्यात “सक्षम” उमेदवार मिळेनासा झाला आहे. त्याचबरोबर माढ्यात ते मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादीतल्या पुनरागमानाकडे डोळे लावून बसले आहेत. साताऱ्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी पवारांची भेट घेऊन उमेदवारीची चाचपणी केली.

    साताऱ्यात विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवायला निकाल नकार दिल्यानंतर शरद पवारांची पंचाईत झाली. कारण त्यांच्याकडे श्रीनिवास पाटलांसारखा “सक्षम” उमेदवाराच उरला नाही. शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर किंवा सुनील माने हे विधानसभेपुरते “ताकदवान” उमेदवार ठरण्याची स्थिती आहे. त्यामुळे सुरुवातीला शरद पवारांनी साताऱ्याची उमेदवारी तुतारी चिन्हावर पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला, पण पवारांचा डाव ओळखून पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्ह आपल्या गळ्यात घालून घेण्याचे नाकारले. त्यामुळे पवारांवर साताऱ्यात उमेदवाराची शोधाशोध करण्याची वेळ आली आहे. ती शोधाशोध अजूनही सुरूच आहे.

    एकेकाळी राष्ट्रीय राजकारणात आपली ताकद अजमावलेल्या शरद पवारांना राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस महाराष्ट्रातले 48 पैकी फक्त 10 मतदारसंघ वाट्याला आले आहेत. पण तेवढे 10 उमेदवार देखील त्यांना पहिल्या यादीत जाहीर करता आलेले नाहीत. त्यांना सगळीकडे उमेदवाराची शोधाशोधच करावी लागत आहे. पवारांच्या तथाकथित बालेकिल्ल्यातील म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील ही स्थिती आहे. उर्वरित महाराष्ट्रात पवारांच्या पक्ष्याच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्याची स्थितीच शिल्लक उरलेली नाही.

    Shrikant Shinde succeeded in regaining his candidature in Kalyan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!