मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Shrikant Shinde महायुतीच्या शपथविधी जरा लांबल्याने विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधणं सुरू केलं आहे. शिवाय, मीडियामध्येही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच शिवसेना खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावाची उपमुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली होती. ज्यावर आता श्रीकांत शिंदे यांनी स्वत:च खुलासा केला आहे.Shrikant Shinde
श्रीकांत शिंदे यांनी ट्वीटद्वार म्हटले आहे की, ‘महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.’
तसेच ‘लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.’ असं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
याशिवाय ‘माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा…’ अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी आपले म्हणणे मांडले आहे.
Shrikant Shinde himself made a clarification on the discussion of the name for the post of Deputy Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- central government : केंद्र सरकारने GDP गणनेचे बेस इयर बदलले; आता 2011-12 ऐवजी 2022-23; अर्थव्यवस्थेचा अचूक अंदाज येणार
- Supreme Court : कॅश फॉर जॉबप्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्टॅलिन यांच्या मंत्र्याला फटकारले, सेंथिल बालाजींच्या जामिनामुळे साक्षीदारांवर दबाव?
- Rahul Gandhi : दाव्याचा निकाल लागेपर्यंत सावरकरांवर टीका नको, राहुल गांधींना कोर्टाचे निर्देश
- Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंनी महायुतीचे अध्यक्ष म्हणून काम पाहावे; रामदास आठवले यांचे मत