विशेष प्रतिनिधी
नाशिक : रामटेकच्या कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये नाशिकचे श्रीराम संस्कृत महाविद्यालय अव्वल ठरले आहे. डिप्लोमा संस्कृत आगम आणि सर्टिफिकेट इन स्पोकन संस्कृत या दोन्ही परीक्षांमध्ये महाविद्यालयाचा निकाल 100 % लागला आहे. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. Shri Ram Sanskrit College has achieved great success in Kalidas Sanskrit University Summer Examinations
वर्षभराच्या या संस्कृत भाषेच्या अभ्यासक्रमात संस्कृतच्या वर्णमालेपासून लौकिक व वैदिक संस्कृतच्या अभ्यासासह व्याकरणाचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. विशेष म्हणजे या वर्गात संस्कृत प्रवेशासाठी कोणतीही अट नव्हती. वय वर्ष 16 ते 70 वयातील दहावी उत्तीर्ण असलेल्या व संस्कृत शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्व व्यक्तींना महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो.
तेजश्री सांबरे – प्रथम
नोकरी- व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना आपला दिनक्रम सांभाळत अत्यंत सोप्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्कृत शिकविले जाते. श्रीराम संस्कृत महाविद्यालयाचे प्रमुख प्राचार्य अतुल तरटे यांनी गुरुकुल पद्धती आणि आधुनिक शिक्षण यांचा संगम साधला असून सलग पाचव्या वर्षी या अभ्यासात विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. याआधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चार सुवर्णपदके मिळाली आहेत.
जान्हवी हसबनीस – द्वितीय
यंदा पाच विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत तर पाच विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत। तेजश्री सांबरे ही विद्यार्थिनी 95% गुण मिळवून सर्वप्रथम आली असून सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. विशेष म्हणजे तेजश्रीच्या आईनेही या अभ्यासात 93% गुण मिळवीत चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे. दुसऱ्या क्रमांकावर 94.50 % गुण मिळविलेली इंजिनिअर असलेली जान्हवी आहे. तृतीय क्रमांक सेवा निवृत्त शिक्षिका मेधा जोग यांनी मिळविला असून त्यांना 93.50 % गुण मिळाले आहेत.
योग अभ्यासासाठी संस्कृतचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे हे ओळखून योग शिक्षिका अंजली राणे यांनी उत्तम अध्ययन करित 93% गुण मिळविले आहेत. सर्वच वयातील विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळाले आहे.
डिप्लोमा संस्कृत, बी.ए संस्कृत, M.A संस्कृत, भगवद्गीता, व्याकरण वर्ग या सर्वच अभ्यासक्रमांचा निकाल 100 % लागला असून संस्कृत शिक्षणाकडे समाजाचा कल वाढल्याचे निरीक्षण प्रा. अतुल तरटे यांनी नोंदविले. अनेक विद्यार्थी संस्कृत करिअरकडे वळाले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार संस्कृतला निश्चितच प्राधान्य दिले आहे. अनेक महिलांना व पुरुषांना शैक्षणिक क्षेत्रात नोकरी आणि संस्कृत कलासेसच्या क्षेत्रात भरपूर संधी निर्माण होत आहेत. प्रा. ऋतुजा तरटे आणि प्राचार्य अतुल तरटे यांचे विद्यार्थ्यांना यासंबंधी मार्गदर्शन होते.
नवीन वर्षाच्या प्रवेशासाठी संस्कृत प्रेमींनी प्राचार्य अतुल तरटे (9850037263) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.
अंजली राणे – चतुर्थ
सविता सांबरे – चतुर्थ
Shri Ram Sanskrit College has achieved great success in Kalidas Sanskrit University Summer Examinations
महत्वाच्या बातम्या
- अतिक अहमदच्या कबरीवर तिरंगा ठेवणाऱ्या काँग्रेस नेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- ट्विटरने कोणालाही सोडले नाही! राहुल गांधी, योगींपासून ते शाहरुख-सलमानपर्यंत सर्वांच्या हटवल्या लेगसी ब्ल्यू टिक्स
- भारताच्या लोकसंख्येवर चीनने म्हटले- संख्या नव्हे, गुणवत्ता महत्त्वाची, चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- आमचे 90 कोटी लोक कामाचे, त्यांच्यात टॅलेंटही आहे
- कॉंग्रेसने इतिहास पळवला, स्वत:ला हवा तसा लिहून घेतला; सावरकर स्मारकातून मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल