‘The Focus India’च्या ‘गप्पाष्टक’मधील विशेष मुलाखतीत विविध प्रश्नांनवर केली भूमिका स्पष्ट
विशेष प्रतिनिधी
पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्यातील कसबा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार आणि पुणे शहाराचे खासदार राहिलेल्या गिरीश बापटांच्या निधनानंतर दीड महिना उलटत नाही, तोच पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या चर्चांनी जोर धरला आहे, विविध राजकीय पक्षही त्या दृष्टीने मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अशावेळी गिरीश बापटांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांचा मुलगा गौरव आणि सून स्वरदा बापट यांचं नावही समोर येत आहे. आणि पक्षाने जबाबदारी दिल्यास ती पार पाडायला आवडेल असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वरदा बापट यांनी द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक कार्यक्रमात या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. Should the Pune Lok Sabha byelection be uncontested Girish Bapat’s daughter in law Swarda gave the answer
स्वरदा बापट म्हणतात, ‘’लोकसभा पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी. असं अगोदर पक्षाकडून आलेलं आहे. त्यामुळे यापुढे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कोअर कमिटी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे सगळे वरिष्ठ ठरवतील. आमचीही पक्षासोबतच इच्छा आहे. जसं निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आम्ही आवाहन केलं आहे पक्ष म्हणून तर ते करतील, नाही तर आम्ही ती जागा जिंकूच. निवडणूक लागली तरी आमची लढण्याची तयारी आहे.’’
भाजपा या गौरव बापट किंवा स्वरदा बापट या पैकी नेमकी कोणाला संधी देणार, की कसबा पोटनिवडणुकीप्रमाणे कुटुंबात उमेदवारी न देता अन्य दुसऱ्या नेत्याला संधी देणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
जसं की सर्वांना माहीतच होतं, गिरीश बापट आणि पुणे हे जणूकाही समीकरण बनलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, त्यानंतर नगरसेवक पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गिरीश बापट यांनी 30वर्षे कसबा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केले आणि त्यानंतर ते पुणे शहराचे खासदारही झाले. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी अगदी विरोधकांशीही सलोख्याचे व मैत्रीपूर्ण संबंध असणारा नेता म्हणून गिरीश बापट यांची ओळख होती. परंतु पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू असे हे व्यक्तिमत्त्व २९ मार्च रोजी काळाने आपल्यातून हिरावून नेले. त्यांच्या जाण्याने खरंतर केवळ पुणे शहराचीच नाहीतर महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राचीही मोठी हानी झाली.
Should the Pune Lok Sabha byelection be uncontested Girish Bapats daughter in law Swarda gave the answer
महत्वाच्या बातम्या
- अरबी समुद्रात चक्रीवादळ बिपरजॉयची निर्मिती, उत्तरेकडे कूच, केरळमध्ये पोहोचणाऱ्या मान्सूनच्या ढगांना रोखले
- मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणार, असे करणारे पहिले भारतीय पंतप्रधान, 2016 मध्ये पहिल्यांदा संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले
- भाजपच्या मागे काँग्रेसची फरफट; पसमांदा मुस्लिमांना पटवण्याची मशक्कत!!
- Delhi AIIMS : हॅकर्सनी पुन्हा एकदा दिल्ली ‘एम्स’ला केले लक्ष्य! रुग्णालयानेच सायबर हल्ल्याची दिली माहिती