विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : नुकताच कोरोनाचा ज्वर काहीसा कमी झालेला आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये आता कोरोना व्यतिरिक्त बाकी आजारी लोकांवर उपचार केले जात आहेत. याआधी फक्त कोरोणा पेशंटसाठीच बरेच हॉस्पिटलस काम करत होते. आता इतर पेशंटवर उपचार सुरू झाल्यामुळे रक्ताची कमतरता कोल्हापूरमध्ये भासत आहे.
shortage of blood in Kolhapur! The challenge of helping the youth organization
त्यामुळे कोल्हापूरमधील डॉक्टरांकडून पेशंटच्या नातेवाईकां तर्फे रक्ताची सोय केली जावी तसेच सांगण्यात येत आहे. ब्लड बँक मध्ये देखील ब्लड शॉर्टेज आहे. ब्लड बँकेत सध्या उपलब्ध असलेले ब्लड पुढील चार ते पाच दिवसांपुरतेच शिल्लक आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील हॉस्पिटल्स कडून युथ ऑर्गनायझेशनला रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ब्लड डोनेशन कॅम्प्स घेतले जावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
जर तुम्ही कोणत्या ऑर्गनायझेशन सोबत जोडलेले असाल किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणती ऑर्गनायझेशन या संबंधी काम करण्यात उत्सुक असेल तर त्यांना माहिती देऊन समाजहितासाठी सहकार्य करावे.
shortage of blood in Kolhapur! The challenge of helping the youth organization
महत्त्वाच्या बातम्या
- आता ‘ या ‘ जिल्ह्यात २० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू
- Mumbai Cruise Drugs Case : गोसावी आणि खबऱ्याची चॅट उघड, मुंबई पोलीस एसआरकेची मॅनेजर पूजा ददलानी बजावणार तिसरी नोटीस
- पूर्वांचल एक्सप्रेस वे वर झालेल्या विमानांच्या गर्जना काय सांगताहेत…??; वाचा पंतप्रधानांच्या भाषणातून…!!
- मोठी बातमी : उद्यापासून करतारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली घोषणा