कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मध्ये विजय काँग्रेसने मिळवला आहे. त्या विजयाच्या आनंदाच्या घुगऱ्या शिवसेनेने खाल्या आहेत. प्रत्यक्षात तिथे निघालीये नांदेड पॅटर्नची लघु आवृत्ती आणि उड्या मारल्या जात आहेत कॅबिनेट मंत्रिपदाच्या…!! Short version of Nanded pattern started in Kolhapur
कोल्हापूर मध्ये भाजप पंढरपूर पॅटर्न घडविण्याच्या महत्त्वाकांक्षा भाजप नेत्यांनी बाळगल्या होत्या. पंढरपूर मध्ये ज्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना नाना भालके यांच्या निधनाची सहानुभूती मिळू शकली नाही, तशीच ती जयश्री जाधव यांच्या कामाला येणार नाही, असा भाजप नेत्यांचा होरा होता. प्रत्यक्षात भाजपमध्ये भाजपचे नेते कोल्हापुरात पंढरपूर पॅटर्न घडवू शकले नाहीत. पण तिथे घडला तो नांदेड पॅटर्न आहे… त्यातही छोट्या प्रमाणात…!!
– देगलूरचे मार्जिन दुपटीपेक्षा मोठे
नांदेडच्या जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आरामात जिंकून आले. कारण भाजपचा तिथे त्या अर्थाने तगडा उमेदवार नव्हता. महाविकास आघाडी तेथे एकसंध पद्धतीने लढल्याच्या कितीही घोषणा केल्या तरी देगलूरच्या विजयासाठी अशोक चव्हाणांनी लावलेली ताकद अधिक महत्त्वाची ठरली. पण देगलूरचा विजय आणि कोल्हापूर उत्तरचा विजय यात गुणात्मक फरक आहे. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांनी जरूर ताकद लावण्याचा प्रयत्न केला. पण विजयाचे मार्जिन 18 हजार मतांच्या पलिकडे ते पोहचवू शकले नाहीत. त्या अर्थाने सतेज पाटील हे “अशोक चव्हाण” होऊ शकले नाहीत. देगलूर मध्ये अंतापूरकर आहे 41000 पेक्षा अधिक मतांनी निवडून आले. कोल्हापूर उत्तर मध्ये विजयाचे मार्जिन 18000 मतांचे आहे.
– कॅबिनेट मंत्री पदाची विश्लेषकी उड्डाणे
पण मराठी माध्यमांच्या विश्लेषकांनी सतेज उर्फ बंटी पाटलांची ताकद आता काँग्रेसमध्ये वाढली आहे. त्यामुळे त्यांना राज्यमंत्री ठेवून चालणार नाही. कॅबिनेट मंत्री बढती दिली पाहिजे अशा प्रचारकी थाटाचे विश्लेषण केले आहे. ज्यात अजिबात सत्य आहे, असे वाटत नाही. काँग्रेस पक्षात इतके उथळ निर्णय घेतले जात नसतात. बंटी पाटलांनी कोल्हापूरच्या विजयात जरूर स्वतःचा वाटा उचलला असेल, पण म्हणून लगेच एखाद्या विषयाची बक्षिसी कॅबिनेट मंत्री पदाचा रूपाने काँग्रेसमध्ये देण्याची पद्धत नाही. हे संबंधित विश्लेषक विसरलेले दिसतात. प्रत्यक्षात कोल्हापूरमध्ये नांदेड पॅटर्नची लघु आवृत्ती निघाली आहे. त्यामुळे त्या लघु आवृत्तीतून विश्लेषणाच्या किती दीर्घ आवृत्या काढायच्या आणि किती लांबण लावायची हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
– भाजपला 78000 मते
राहता राहिले भाजपचे भाजपला 2014 च्या निवडणुकीत महायुती असूनही तेथे 41000 मते मिळाली होती. आता भाजपने एकट्याने ताकद लावून 78000 मते मिळवली आहेत. विजय हा “विजय” असला आणि पराभव हा “पराभव” असला तरी 78000 मतांचा आकडा छोटा नाही. ही देखील महाविकास आघाडी नेत्यांना टोचणारी वस्तुस्थिती आहे. अर्थात विजयाच्या गुलालात डोळे धूसर झाल्याने त्यांना ही 78000 मध्ये दिसत नाहीत आणि विश्लेषकांच्या डोळ्यावर पॅकेजी पडळ आल्याने त्यांनाही ही मते दिसत नाहीत. पण म्हणून कोल्हापूर उत्तरच्या विजयाची नांदेडची लघु आवृत्ती!! ही वस्तुस्थिती लपून राहत नाही. हेही तितकेच खरे…!!
Short version of Nanded pattern started in Kolhapur
महत्त्वाच्या बातम्या
- हनुमानाच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण
- कोल्हापूर पोटनिवडणुकीत जिंकली काँग्रेस; आनंदाच्या घुगऱ्या खात आहेत शिवसेनेचे संजय राऊत!!
- Kolhapur Byelection : कोल्हापूर उत्तर मध्ये जिंकली काँग्रेस; हरला भाजप; पण दणका मात्र शिवसेनेला!!
- पुतीन यांना मुलीचा गॉडफादर म्हणणाऱ्या व्यक्तीची ५५ घरे, २६ कार युक्रेनमध्ये जप्त
- पंजाबमध्ये १ जुलैपासून घरगुती ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा
- रशियाचे २० हजार सैनिक मारले, युक्रेनचा दावा; युद्ध सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला
- एअर इंडिया कर्मचाऱ्यांना देणार टप्प्याटप्प्याने पूर्ण वेतन; कोरोना नियंत्रणात आल्यामुळे निर्णय