विशेष प्रतिनिधी
मुंबई : बुधवारपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार आहेत. तर शुक्रवारपासून राज्यातील चित्रपटगृहदेखील सुरू होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर व्यापारी, उपाहारगृहे आणि दुकान मालकांच्या संघटनांकडून सणासुदीच्या काळामध्ये उपहारगृहे आणि दुकाने यांची वेळमर्यादा वाढविण्यात यावी. अशी मागणी केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील उपाहारगृहे आणि दुकानांची वेळ मर्यादा वाढविण्यात यावी कारण कोरोना पसरण्याचा वेग शिथिल झाला आहे. असे राज्य सरकारला सुचवले होते.
Shops will be open till 11 pm and restaurants will be open till 12 noon, the state government has taken a big decision on the occasion of Diwali
आता या विनंतीवर टास्क फोर्स सोबतच्या चर्चेनंतर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयक कृतिगटाच्या तज्ज्ञांशी सोमवारी सविस्तर चर्चा केली. राज्यातील उपहारगृहे मध्यरात्री 12 वाजेपर्यंत चालू राहतील. तर दुकानांची वेळ मर्यादा रात्री 11 पर्यंतची केली आहे. सणासुदीच्या काळामध्ये लोक शॉपिंगसाठी बाहेर पडणार. त्यामध्ये कोरोनाचा ज्वरही काहीसा कमी झालेला आहे. संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. प्रसाराचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे पाऊल महाराष्ट्र शासनाने उचलले आहे.
अखेर मुहूर्त ठरलाच ! राज्यातील चित्रपटगृहे , नाट्यगृहे उघडणार ; पण ‘ही ‘ असणार नियमावली
दिवाळीचा सण जवळ आला आहे. सणाच्या निमित्ताने लोक शॉपिंगसाठी बाहेर पडणार. त्यामुळे काही शहरांमध्ये रात्री 12 पर्यंतच दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची खबरदारी घेण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. वेळमर्यादा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले असले तरी मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांमध्ये रात्री ११ पर्यंत व्यवहार खुले ठेवण्यास मुभा दिली आहे. याबाबत बुधवारी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत आहे.
Shops will be open till 11 pm and restaurants will be open till 12 noon, the state government has taken a big decision on the occasion of Diwali
महत्त्वाच्या बातम्या
- लाईफ स्किल्स : एक मिनिटाचा स्ट्रेच व्यायामप्रकारही शरीरासाठी मोलाचा
- हर्बल तंबाखू लागवडीसाठी शेतकऱ्यांना परवानगी द्या ; सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पाठविले पत्र
- T20 World Cup : विराट कोहली म्हणाला – ‘वर्ल्डकप स्पर्धेत मी रोहितसोबत ओपनिंगला येणार नाही’…काय आहे कारण?
- पुण्यात उपायुक्ताला १ लाख ९० हजारांची लाच घेताना अटक; लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई