• Download App
    धक्कादायक प्रकार : २० माकडांना विष देऊन संपवले ; मृतदेह गोण्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला फेकलेShocking type: 20 monkeys were poisoned; The bodies were packed in sacks and dumped on the side of the road

    धक्कादायक प्रकार : २० माकडांना विष देऊन संपवले ; मृतदेह गोण्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला फेकले

    वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या माकडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दोषींचा तपास सुरू आहे त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत.Shocking type: 20 monkeys were poisoned; The bodies were packed in sacks and dumped on the side of the road


    विशेष प्रतिनिधी

    कोलार : प्राण्यांवर होत असलेले अत्याचाराची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकच्या कोलारमध्ये २० माकडांना विष देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.माकडांना विष देऊन त्यांना संपवण्यात आलं. त्यानंतर त्यांचे मृतदेह पोत्यांमध्ये भरून फेकून देण्यात आले.

    दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या माकडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दोषींचा तपास सुरू आहे त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत.असाच एक प्रकार जुलैमध्ये हस्सन जिल्ह्यात घडला होता. त्यामध्ये ३० माकडं एका गावात मृतावस्थेत आढळून आली होती. तर जवळपास २० माकडं जखमी अवस्थेत पडली होती.



    हस्सन जिल्ह्यातील बेलूर तालुक्यात असलेल्या चोवडानहल्ली गावात हा प्रकार घडला होता. माकडांना आधी विष देण्यात आलं आणि मग त्यांना मारहाण करण्यात आली. माकडांना मारणाऱ्यांनी त्यांना गोणींमध्ये भरलं आणि त्या चोवडानहल्ली गावाजवळ रस्त्याच्या शेजारी टाकल्या.

    तेथील स्थानिक तरुणांनी पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तरुणांनी या गोण्या उघडून पाहिल्या. त्यावेळी काही माकडं श्वास घेताना तडफडत असल्याचं त्यांना दिसलं. मात्र मारहाण झाल्यानं त्यांना हालचालही करता येत नव्हती.

    Shocking type: 20 monkeys were poisoned; The bodies were packed in sacks and dumped on the side of the road

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री

    Vanchit मुंबईत काँग्रेस आणि वंचित दोघेही अपयशी; तरी वंचितचा काँग्रेसला टोमणा!!