वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या माकडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दोषींचा तपास सुरू आहे त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत.Shocking type: 20 monkeys were poisoned; The bodies were packed in sacks and dumped on the side of the road
विशेष प्रतिनिधी
कोलार : प्राण्यांवर होत असलेले अत्याचाराची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकच्या कोलारमध्ये २० माकडांना विष देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.माकडांना विष देऊन त्यांना संपवण्यात आलं. त्यानंतर त्यांचे मृतदेह पोत्यांमध्ये भरून फेकून देण्यात आले.
दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या माकडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दोषींचा तपास सुरू आहे त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत.असाच एक प्रकार जुलैमध्ये हस्सन जिल्ह्यात घडला होता. त्यामध्ये ३० माकडं एका गावात मृतावस्थेत आढळून आली होती. तर जवळपास २० माकडं जखमी अवस्थेत पडली होती.
हस्सन जिल्ह्यातील बेलूर तालुक्यात असलेल्या चोवडानहल्ली गावात हा प्रकार घडला होता. माकडांना आधी विष देण्यात आलं आणि मग त्यांना मारहाण करण्यात आली. माकडांना मारणाऱ्यांनी त्यांना गोणींमध्ये भरलं आणि त्या चोवडानहल्ली गावाजवळ रस्त्याच्या शेजारी टाकल्या.
तेथील स्थानिक तरुणांनी पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तरुणांनी या गोण्या उघडून पाहिल्या. त्यावेळी काही माकडं श्वास घेताना तडफडत असल्याचं त्यांना दिसलं. मात्र मारहाण झाल्यानं त्यांना हालचालही करता येत नव्हती.
Shocking type: 20 monkeys were poisoned; The bodies were packed in sacks and dumped on the side of the road
महत्त्वाच्या बातम्या
- झायडस कॅडीला लस लवकरच उपलब्ध होणार, आरोग्यमंत्री राजेश भूषण यांनी गुरूवारी जाहीर केले
- पोलीस कर्मचारी बडतर्फ! पोलिस मारहाणीत उद्योजकाचा मृत्यू, कानपुर मध्ये असंतोषाचे वातावरण
- उदय सामंत म्हणाले – शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरला ; तर कॉलेज दिवाळीनंतर सुरु
- अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश