• Download App
    पुण्यातील धक्कादायक घटना : मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV, शाळेत शिक्षणाच्या नावाखाली ख्रिश्चन धर्माचा प्रचार? Shocking incident in Pune CCTV in girls  toilet preaching Christianity in the name of education in school

    पुण्यातील धक्कादायक घटना : मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV, शाळेत शिक्षणाच्या नावाखाली ख्रिश्चन धर्माचा प्रचार?

    विद्यार्थी अन् पालकांच्या तक्रारीनंतर विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकांस दिला चोप!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे :  पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तळेगाव परिसरातील डीवाय पाटील शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV बसवण्यात आले अन् ख्रिश्चन धर्म प्रसाराच्या हेतूने तशी प्रार्थना करायला लावल्याच्या पालकांच्या तक्रारीनंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित शाळेच्या मुख्यध्यापकाचे कपडे फाडत चोप दिला. Shocking incident in Pune CCTV in girls  toilet preaching Christianity in the name of education in school

    अलेक्झांडर कोट्स असे मारहाण झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. मुख्याध्यापकांना मारहाण करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय शाळेचे मुख्याध्यापक शाळेत शिकवण्यापेक्षा ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत असत. मुलांना ख्रिश्चन धर्मासाठी प्रार्थना करायला लावली जायची. शिवाय, हिंदू सणांच्या दिवशी मुलांना सुट्टी दिली जात नव्हती. याप्रकरणी पोलीस ठाण्यातच तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    शाळेत योग दिनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला नव्हता. शाळेतील बहुतांश शिक्षक जाणीवपूर्वक ख्रिश्चन धर्माचे ठेवले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. जे जबरदस्तीने मुलांना ख्रिश्चन शिक्षण देत होते.  सध्या सोशल मीडियावर मुख्याध्यापकांना मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत लेखी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. ही बाब समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने मुख्याध्यापकांना दीर्घ रजेवर पाठवले आहे.

    Shocking incident in Pune CCTV in girls  toilet preaching Christianity in the name of education in school

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस