• Download App
    Azad Maidan आझाद मैदानात संतापजनक घटना: मराठा आंदोलकांकडून महिला पत्रकारांशी गैरवर्तन

    Azad Maidan : आझाद मैदानात संतापजनक घटना: मराठा आंदोलकांकडून महिला पत्रकारांशी गैरवर्तन

    Azad Maidan

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Azad Maidan आझाद मैदानात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा आंदोलकांच्या आंदोलनावर मोठा वादंग उसळला आहे. आंदोलकांच्या वर्तणुकीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये गोंधळ घालणे, रस्त्यावर थांबून वाहतूक कोंडी करणे असे प्रकार दिसले. परंतु आता महिला पत्रकारांशी केलेल्या असभ्य वर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.Azad Maidan

    आझाद मैदानात वार्तांकनासाठी उपस्थित असलेल्या काही महिला पत्रकारांना आंदोलकांकडून धक्काबुक्की, कपडे ओढण्याचा प्रयत्न, अश्लील वक्तव्ये आणि बूम माईक खेचण्याचे प्रकार घडल्याची तक्रार झाली आहे. टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना स्पष्ट इशारा दिला आहे.Azad Maidan



    असोसिएशनच्या निवेदनात म्हटले आहे की, “मीडिया प्रतिनिधी दिवस-रात्र पावसात उभे राहून आंदोलनाचे वार्तांकन करत आहेत. तरीदेखील तुमचे कार्यकर्ते पत्रकारांना, विशेषतः महिला पत्रकारांना, त्रास देत आहेत. पत्रकारांचा घेराव घालून असभ्य टिप्पणी केली जात आहे, तर कॅमेरामननाही धक्काबुक्की केली जात आहे. हा प्रकार अतिशय लाजीरवाणा आहे.”

    पत्रकार संघटनेने मनोज जरांगे यांना थेट उद्देशून विचारले की, “तुम्ही स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणवता, मग महिला पत्रकारांचा अपमान कसा करता? जर ताबडतोब असे प्रकार थांबले नाहीत तर मुंबईतील सर्व मीडिया प्रतिनिधी तुमच्या आंदोलनाचे वार्तांकन बहिष्कृत करतील.”

    मीडिया संघटनांकडून झालेल्या या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेता पोलिसांनीही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून महिला पत्रकारांना सुरक्षा देण्याची मागणी पुढे आली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देणे आवश्यक असल्याचे पत्रकार जगतातून म्हटले जात आहे.

    Shocking Incident at Azad Maidan: Maratha Protesters Misbehave with Female Journalists

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Supriya Sule : मराठा आंदोलनात सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बाटल्या फेकल्या; मनोज जरांगेंना भेटून परतताना आंदोलकांचा घेराव

    Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले- एकतर विजयी यात्रा, नाहीतर अंत्ययात्रा; आम्ही OBC सोबत जाणारच!

    Sumona Chakravarti : मराठा आंदोलकांकडून गैरवर्तन, दक्षिण मुंबईत अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा धक्कादायक अनुभव