• Download App
    शिर्डीत रेकी केल्याची दुबईतून अटक केलेल्या दहशतवाद्यांची धक्कादायक कबुली!!Shocking confession of terrorists arrested from Dubai for practicing Reiki in Shirdi

    शिर्डीत रेकी केल्याची दुबईतून अटक केलेल्या दहशतवाद्यांची धक्कादायक कबुली!!

    प्रतिनिधी

    शिर्डी : दुबईतून आलेल्या दहशतवाद्यांनी साईबाबांच्या शिर्डीत रेकी केल्याची धक्कादायक कबूली दिली आहे. दुबईमधील या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्यांनी शिर्डीची रेकी केल्याची बातमी आल्याने, एकच खळबळ उडाली आहे. शिर्डीतील लाखो भाविकांवर या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती गुजरात एटीएसने दिली आहे.Shocking confession of terrorists arrested from Dubai for practicing Reiki in Shirdi

    संपादकांच्या घरी केली रेकी

    लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय संवेदनशील देवस्थान असल्याने, याआधीही साई मंदिराला धमकीचे निनावी पत्रे तसेच मेल आले आहेत. या दहशतवाद्यांनी शिर्डीचे मूळचे रहिवासी आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या एका हिंदी चॅनेलच्या संपादकांच्या शिर्डीतील घरी आणि दिल्लीतील कार्यालयाची रेकी केल्याची कबुली देण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून अवैध हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

    दुबईतून अटक केलेले दहशतवादी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी या तिघांनी ही रेकी केली होती. या तिघांचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कनेक्शन आहे. याप्रकरणी आतापर्यंत 6 मौलवींसह 2 दहशतवादी अशा 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

    Shocking confession of terrorists arrested from Dubai for practicing Reiki in Shirdi

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!