Sunday, 11 May 2025
  • Download App
    |वसेना फुटीची पुनरावृत्ती; संपूर्ण राष्ट्रवादीवर पक्षाध्यक्ष अजितदादांचा दावाShivsena's split repetition, ajit pawar claims on whole NCP

    शिवसेना फुटीची पुनरावृत्ती; संपूर्ण राष्ट्रवादीवर पक्षाध्यक्ष अजितदादांचा दावा; निवडणूक आयोगात कॅव्हेट दाखल करण्याची शरद पवारांवर वेळ!!

    प्रतिनिधी

    मुंबई : आमदारांच्या संख्येत शरद पवार गटावर मात केल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष या नात्याने संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावर अधिकृत कायदेशीर दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगात त्यासंदर्भातले पत्र दिले आहे. त्यामुळे शरद पवारांवर कॅव्हेट दाखल करून आपले म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह अजितदादा गटाला देऊ नये, अशी विनंती करावी लागली आहे. शिवसेना फुटींची ही पुनरावृत्ती आहे.Shivsena’s split repetition, ajit pawar claims on whole NCP

    शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करून आमदार संख्येच्या बळावर उद्धव ठाकरेंवर मात करून दाखवली. कायदेशीर दृष्ट्या शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे आले. हेच नेमके राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडताना दिसत आहे. अजितदादा गटाकडे 40 आमदारांच्या सह्यांचे प्रतिज्ञापत्र आहे. हे प्रतिज्ञापत्र त्यांनी निवडणूक आयोगात दाखल केले आहे. शिवाय अजित दादांच्या गटाच्या कार्यकारिणीने पक्षात नेमणुका करून शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या जागी अजितदादांची नियुक्ती केल्याचे पत्रही निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसवर घड्याळ चिन्ह सकट अजितदादांचा दावा निवडणूक आयोगात दाखल झाला आहे.



    या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने निवडणूक आयोगात कॅव्हेट दाखल करून आपल्या गटाचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह घड्याळ अजितदादा गटाला देऊ नये, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे.

    शिवसेना फुटीच्या वेळी याच पद्धतीची विनंती उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर लाखो प्रतिज्ञापत्रे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी निवडणूक आयोगात दाखल केली होती. पण आमदार संख्येच्या बळावर आणि कायदेशीर तरतुदींच्या आधारे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेतली फूट आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधली फूट यांचा कायदेशीर घटनाक्रम समान आहे.

    Shivsena’s split repetition, ajit pawar claims on whole NCP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा