• Download App
    SHIVSENA VS SHIVSENA: भाजप-शिवसेना युतीबाबत अब्दुल सत्तार सकारात्मक - संजय राऊतांचा मात्र इगो हर्ट म्हणाले-याबाबत बोलण्याचा हक्क फक्त मलाच !। SHIVSENA VS SHIVSENA: Abdul Sattar Positive About BJP-Shiv Sena Alliance - Sanjay Raut's Ego Hurt Says Only I

    SHIVSENA VS SHIVSENA: भाजप-शिवसेना युतीबाबत अब्दुल सत्तार सकारात्मक – संजय राऊतांचा मात्र इगो हर्ट म्हणाले-याबाबत बोलण्याचा हक्क फक्त मलाच !

    Nitin Gadkari यांनी पुढाकार घेत पूल बांधला तर Shivsena आणि BJP यांच्यात पुन्हा एकदा युती होऊ शकते, असे विधान राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केले होते. SHIVSENA VS SHIVSENA: Abdul Sattar Positive About BJP-Shiv Sena Alliance – Sanjay Raut’s Ego Hurt Says Only I


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा युती होणार का? याची चर्चा नेहमीच सुरू असते. दरम्यान, नितीन गडकरी यांनी पुढाकार घेत पूल बांधला तर शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा युती होऊ शकते, असे विधान शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केले होते. मात्र हे संजय राऊतांना आजिबात पटले नाही एकप्रकारे त्यांचा इगो हर्ट झाला आहे .राऊत म्हणाले सत्तार काय फार मोठे नेते नाहीत त्यांची हळद अजून उतरायची आहे.या विषयावर बोलण्याचा हक्क फक्त माझ्यासारख्या जन्मजात शिवसैनिकानांच आहे .त्यांची तर अजून हळद उतरायची आहे .यावरून शिवसेना विरूद्ध शिवसेना असेच चित्र रंगले आहे.

    सत्तारांच्या या विधानावर संजय राऊत यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली . आणि बाहेरून पक्षात आलेल्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व द्यायचे नसते असेच ते म्हणाले आहेत. तसेच सत्तार हे पक्षात नवीन आहेत, त्यांची हळद अजून उतरायची आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी अब्दुलसत्तार यांचे कानही टोचले आहेत. पक्ष समजून घ्यायला वेळ लागतो. जे सेनेत जन्माला आले नाहीत, त्यांना पुढची किमान २० वर्षे शिवसेनेत घालवावी लागतील. मग त्यांनी सेनेतील घडामोडींविषयी बोलले पाहिजे, असेही ते म्हणाले .



    राऊत पुढे म्हणाले की, कुठल्याही नेत्याला पक्ष समजून घेण्यासाठी वेळ लागतो. माझ्यासारख्या व्यक्ती जन्मजात शिवसेनेमध्ये आहे. त्यामुळे मला काय बोलायचं, यासाठी कुणाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज भासत नाही. मात्र जे जन्मता शिवसेनेत आलेले नाहीत, त्यांना पक्ष समजून घेण्यासाठी किमान २० वर्षे घालवावी लागतील. अब्दुल सत्तार हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. पक्षात रुळत आहेत, लोकप्रिय होत आहेत. मात्र विरोधकांच्या हातात कोलीत मिळेल, अशी विधान त्यांनी करू नयेत, असा सल्लाही त्यांनी सत्तार यांना दिला.

    SHIVSENA VS SHIVSENA: Abdul Sattar Positive About BJP-Shiv Sena Alliance – Sanjay Raut’s Ego Hurt Says Only I

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा