नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदावर दावा; पण राष्ट्रवादीची शॅडो कॅबिनेट नेमून पवारांनी काढली हवा!!, असे म्हणायची वेळ शरद पवारांनी साधलेल्या “पॉलिटिकल टाइमिंग” मुळे आली आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मातोश्रीवर बैठक होऊन शिवसेनेच्या आमदार संख्येच्या बळावर विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकण्याचा निर्णय झाला, नेमक्या त्याच दिवशी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार खासदारांची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची “शॅडो कॅबिनेट’ नेमली. या “पॉलिटिकल टाइमिंग” मधून पवारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधी पक्षनेते पदावरच्या दाव्याला काटशह मारला.Shivsena UBT claims opposition leaders post, but Sharad Pawar separately appointed shadow cabinet
वास्तविक “शॅडो कॅबिनेट” ही संकल्पना मूळची ब्रिटिश लोकशाहीतली. सत्ताधारी पक्षाच्या विविध मंत्र्यांवर आणि त्यांच्या खात्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षांमधल्या तोलामोलाच्या नेत्यांकडे संबंधित खात्यांची जबाबदारी सोपवून त्या खात्याच्या कारभारामधल्या उणीवा शोधून काढण्याचे काम विरोधी पक्षाचे सदस्य करतात, त्याला “शॅडो कॅबिनेट” म्हणतात आणि या “शॅडो कॅबिनेटचे” नेतृत्व संसदेतले किंवा विधिमंडळातले विरोधी पक्षनेतेच करत असतात, जेणेकरून सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवून नेमकेपणाने त्यांना “टार्गेट” करता यावे यासाठी हा “उद्योग” केला जातो. पण संसद किंवा विधिमंडळ यांच्यातल्या विरोधी पक्षनेते पदाला जो वैधानिक दर्जा म्हणजे कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा आहे, तो दर्जा “शॅडो कॅबिनेटला” नाही किंवा “शॅडो कॅबिनेट” मधल्या सदस्यांना देखील नाही.
पण महाराष्ट्रात सगळ्या विरोधी पक्षांची मिळून आमदार संख्या फक्त 49 असताना तसेही विरोधी पक्षनेते पद देणे किंवा न देणे हे पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या म्हणजेच फडणवीस सरकारच्या हातात आहे. फडणवीस सरकारला मान्य असेल, तरच विरोधकांमधल्या कुठल्या आमदाराला विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदाचा वैधानिक दर्जा देता येणे शक्य आहे. पण तरीही शिवसेनेतल्या २० आमदार संख्येच्या बळावर विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याचा निर्णय मातोश्रीवर झाला. नेत्याची निवड उद्धव ठाकरेंनी सगळ्या आमदारांवरच सोपवून दिली. त्यामुळे भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि आदित्य ठाकरे यांची नावे त्या रेसमध्ये माध्यमांनी आणली.
पण नेमकी त्याच वेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठकी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेतली आणि पक्ष विस्तार करण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर फडणवीस सरकारवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र “शॅडो कॅबिनेट” नेमले. त्यात जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, रोहित पवार एकनाथ खडसे, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे वगैरे नेत्यांचा समावेश केला. त्यांच्याकडे फडणवीस सरकारच्या १०० दिवसांच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली. पण या सगळ्यात पवारांनी नेमलेले “शॅडो कॅबिनेट मंत्री” पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भविष्यकाळात कितपत टिकून राहतील हा भाग अलहिदा, पण पवारांनी “पोलिटिकल टाइमिंग” साधून परस्पर “शॅडो कॅबिनेट” नेमून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकण्याच्या राजकीय खेळीला काटशह दिला, हे मात्र निश्चित!!
Shivsena UBT claims opposition leaders post, but Sharad Pawar separately appointed shadow cabinet
महत्वाच्या बातम्या
- Nagpur एच एस ह्युसंग कंपनीची नागपूरात १७४० कोटींची गुंतवणूक; ४०० युवकांना रोजगार!!
- Manipur : मणिपूरच्या सात जिल्ह्यांतील लोकांनी शस्त्रे, दारूगोळा अन् बंदुका सुरक्षा दलांना सोपवल्या
- मुंबईतील डिफेन्स क्लबमध्ये ७८ कोटींचा घोटाळा!
- Hazaribagh :महाशिवरात्रीला झारखंडमध्ये दोन गटांत हिंसाचार, दगडफेक व जाळपोळीत अनेक जखमी