प्रतिनिधी
मुंबई : अखेर महाराष्ट्रात एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. शिवसेनेच्या ठाकरे गटाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे”, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” हे नाव निवडणूक आयोगाने मंजूर केले. Shivsena UBT asks Shivsena B, who is your Balasaheb
मात्र आपल्या गटाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” हे नाव मिळताच या पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “बाळासाहेबांची शिवसेना” या पक्षावर शरसंधान साधताना तुमचे “बाळासाहेब” कोण??, असा सवाल केला आहे!!
“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” या पक्षाचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव या दोघांनीही “बाळासाहेबांची शिवसेना” या पक्षाला हे बाळासाहेब कोण?? असा सवाल केला आहे. कारण आमच्या पक्षाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” असे नाव मिळाल्याने उद्धव साहेब आमचे नेते आहेत.
बाळासाहेब हे नाव आमच्याकडेच आहे आणि ते ठाकरे आहेत हे सिद्ध झाले आहे. पण तुमच्या पक्षाला “बाळासाहेबांची शिवसेना” हे नाव मिळाले आहे. महाराष्ट्रात अनेक “बाळासाहेब” आहेत. त्यापैकी तुमचे “बाळासाहेब” कोण??, असा सवाल अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला अर्थात शिंदे गटाला केला आहे. त्याचवेळी बाळासाहेब या नावाबद्दल आम्हाला हजर आहेत असा खुलासा भास्कर जाधव यांनी करून टाकला आहे.
Shivsena UBT asks Shivsena B, who is your Balasaheb
महत्वाच्या बातम्या
- गदा, तलवार आणि तुतारी – शिंदे गटाची तयारी : निवडणूक आयोगाला देणार 3 नवी नावे आणि 3 नवे चिन्ह, अंधेरी पोटनिवडणुकीत यापैकीच वापरणार
- 2024साठी भाजपचा मेगा प्लॅन : 2019 मध्ये गमावलेल्या जागा लक्ष्य, 40 जागांवर मोदी, तर 104 जागांवर नड्डा-शहांसह इतर केंद्रीय मंत्र्यांच्या सभा
- द फोकस एक्सप्लेनर : हिंदू देवी-देवतांचा अपमान, वाद आणि केजरींच्या मंत्र्याचा राजीनामा, वाचा सविस्तर
- WATCH देशाच्या अर्थमंत्री जेव्हा भाजी खरेदी करतात : निर्मला सीतारामन चेन्नईच्या बाजारात पोहोचल्या, स्वत: निवडून केली भाजीपाला खरेदी