• Download App
    संजय राऊतांच्या बाहेर तोफा; शिवसेनेला मात्र घरातूनच सुरुंग; सुनील राऊत फुटायच्या तयारीत!! Shivsena splits : Sanjay Raut's brother Shivsena MLA Sunil Raut may join eknath shinde group

    एकनाथ शिंदे बंड : संजय राऊतांच्या बाहेर तोफा; शिवसेनेला मात्र घरातूनच सुरुंग; सुनील राऊत फुटायच्या तयारीत!!

    प्रतिनिधी

    मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत बाहेर बाहेरून बंडखोर गटावर जोरदार तोफा डागत आहेत. एका बापाचे, दोन बापाचे, 40 रेड, बळी, प्रेते पोस्टमार्टेम असले अश्लाघ्य शब्द वापरून यथेच्च बदनामी करत आहेत. Shivsena splits : Sanjay Raut’s brother Shivsena MLA Sunil Raut may join eknath shinde group

    पण संजय राऊत बंडखोर आमदारांवर अशा तोफा डागत असताना दुसरीकडे शिवसेनेला मात्र त्यांच्या घरातूनच सुरुंग लागताना दिसत आहे. संजय राऊत यांचे धाकटे भाऊ आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत हे देखील आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून फुटून एकनाथ शिंदे गटाला मिळण्याच्या तयारीत असल्याची बातमी आयबीएन लोकमतने दिली आहे.



    – सुनील राऊतांना मंत्रिपद न दिल्याचा राग

    गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत जरी तावातावाने शिवसेनेच्या वेगवेगळ्या मेळाव्यामध्ये भाषणे करत असते तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनील राऊत यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याचा त्यांच्या मनात राग आहे. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या वेळी देखील तो अनेकांना दिसला आहे आणि टीव्हीच्या कॅमेराने टिपला आहे. गेल्या अडीच वर्षात सुनील राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. आता एकनाथ शिंदे यांचा गट आमदारांच्या संख्येने मजबूत होत असताना खुद्द सुनील राऊत देखील त्यांच्या गटाला जाऊन मिळण्याचे मनसुबे आखत असल्याची बातमी आयबीएन लोकमतने दिली आहे.

    – उदय सामंत गुवाहाटीत

    कालपर्यंत शिवसेनेच्या सगळ्या बैठकांना उपस्थित राहणारे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हे आज अचानक गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले उद्या ते 11.00 वाजता भूमिका मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांच्या घरातूनच शिवसेनेला सुरुंग लागल्याचे लागल्याची बातमी आली आहे. सुनील राऊत हे मिळण्याची शक्यता आहे.

    Shivsena splits : Sanjay Raut’s brother Shivsena MLA Sunil Raut may join eknath shinde group

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस