• Download App
    एकनाथ शिंदे यांना काल मुख्यमंत्रीपदाची ऑफर; आज शिवसेनेची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी!!; की फेकले नवे जाळे??Shivsena splits : Sanjay Raut offers eknath shinde group, will Shivsena really separate from maha vikas aaghadi??

    शिवसेनेत फूट : एकनाथ शिंदे यांना काल मुख्यमंत्रीपदाची ऑफर; आज शिवसेनेची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी!!; की फेकले नवे जाळे??

    शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटात आता फक्त 14 ते 17 आमदार उरलेले असताना आता या गटाने सुमारे 35 ते 40 आमदार असलेल्या एकनाथ शिंदे गटावर नवे जाळे फेकले आहे!! Shivsena splits : Sanjay Raut offers eknath shinde group, will Shivsena really separate from maha vikas aaghadi??

    काल उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मधून एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, तर आज संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अचानक शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, अशी ऑफर देऊन हे नवे जाळे फेकले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेनेच्या 2 बंडखोर आमदारांना मुंबईत पत्रकारांसमोर पेश केले. त्यांनी त्यांची कैफियत पत्रकारांसमोर मांडली आणि त्यानंतर अचानक संजय राऊत यांनी शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकते याची तयारी दाखवली. मात्र ही तयारी दाखवताना त्यांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना 24 तासात मुंबईत परत येण्याचे आवाहन केले आहे. बंडखोर आमदारांनी स्वतः मुंबईत येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी. त्यांच्यासमोर शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी करावी. त्यांच्या मागणीचा जरूर विचार केला जाईल, असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले. हे विधान आपण जबाबदारीने करत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.


    Eknath Shinde Profile : एकेकाळी रिक्षाचालक होते एकनाथ शिंदे, जाणून घ्या, कसे चमकले राजकीय पटलावर? दिग्गज नेते कसे बनले?


    मात्र काल दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये दिलेली मुख्यमंत्रीपदाची ऑफर पुढच्या 15 – 20 मिनिटात एकनाथ शिंदे यांनी ट्विटर वारे फेटाळून लावली होती. कारण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी एकनाथ शिंदे गटाची मूळ मागणीच नव्हती. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे भरण-पोषण होत असताना शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होतो आहे तो दूर करण्याची शिंदे गटाची मूळ मागणी आहे. त्याचबरोबर हिंदुत्वासाठी भाजपशी युती करण्याची ही मागणी आहे. आता उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाची दुसरी मागणी म्हणजे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने मान्य केल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. म्हणजे निदान संजय राऊत वक्तव्यातून तरी तसे प्रतीत होत आहे.

    मात्र संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाने एक वेगळे वळण घेतले असून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटापुढे उद्धव ठाकरे यांच्या गटाने खरंच शरणागती पत्करली आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटातले आमदार परत खेचून आणण्यासाठी त्यांच्यावर जाळे फेकले आहे?? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता एकनाथ शिंदे गट संजय राऊत यांचे वक्तव्य किती गांभीर्याने घेतो आणि खरंच महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडण्याची ऑफर स्वीकारतो का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    पण काल दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊनही अशी ऑफर देऊन देखील त्यांनी ती ऑफर अवघ्या अर्धा तासात फेटाळली. आता संजय राऊत यांची ऑफर एकनाथ शिंदे यांचा गट किती सिरीयसली घेतो?? आणि त्यावर काय उत्तर देतो?? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Shivsena splits : Sanjay Raut offers eknath shinde group, will Shivsena really separate from maha vikas aaghadi??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!