एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडत असताना महाविकास आघाडी एकजिनसी आहे, असे कालपर्यंत सांगणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नेते आज आपले अंग शिवसेनेच्या बंडातून काढून घेताना दिसत आहेत!! Shivsena splits : Congress – NCP deserts Shivsena, Ajit Pawar “cool”, Uddhav Thackeray left alone
– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते “थंड”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही वरिष्ठ नेत्याने दुपारपर्यंत शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडावर साधी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची देखील तसदी घेतलेली नाही. ठाकरे – पवार सरकार डळमळले आहे पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र सरकार स्थिर असल्याचा आव आणत आज प्रशासकीय बैठक देखील घेतली आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्री आणि आमदारांनी समवेत बैठक घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी जणू काही आपला काही संबंधच नाही जे काय असेल ते शिवसेनेने आपले आपण बघून घ्यावे, अशा पद्धतीने अजित पवारांनी दुर्लक्ष केले आहे.
– नाराजी ठाकरेंवर; राग पवारांवर!!
गेल्या अडीच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचे आणि मंत्र्यांचे राजकीय भांडवलीकरण पुरते करून घेतले आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असले तरी त्यांचा खरा राग राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आणि अजित पवार यांच्यावर आहे. कारण राष्ट्रवादीच्या आमदारांना आणि मंत्र्यांना जादा निधी देताना यांनी शिवसेना आणि काँग्रेस या आमदारांवर खाऱ्या अर्थाने अन्याय केला आहे. येथे मुख्यमंत्र्यांवर नाराजी आणि अजित पवारांवर राग हे नेमके राजकीय वेगळेपण आहे.
– काँग्रेसचे दुर्लक्ष
मात्र शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संकटात असताना राष्ट्रवादीचे एकही नेते बोलायला तयार नाहीत. दुसरीकडे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यापासून ते भाई जगताप यांच्यापर्यंत एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे. तो त्यांचा त्यांनी पाहून घ्यावा, असा पवित्रा घेतला आहे. काँग्रेसमध्ये विधान परिषद निवडणुकीत फूट पडल्यानंतर आपला पक्ष सावरण्याच्या धांदलीत काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे शिवसेनेचे बंडाचे झेंगट आपल्या अंगावर का घ्या?, असा फक्त राजकीय विचार त्यांनी केला आहे केल्याचे दिसत आहे.
Shivsena splits : Congress – NCP deserts Shivsena, Ajit Pawar “cool”, Uddhav Thackeray left alone
महत्वाच्या बातम्या
- विधान परिषद निवडणूक : इंदिराजी – राजीवजींच्या काळातले “द्रष्टेपण” 2022 मध्ये सिद्ध!!
- महाविकास आघाडीत असंतोषाचा स्फोट; भाजपला विधानसभेत 134 आमदारांचे मताधिक्य!!
- विधान परिषद निवडणूक : फडणवीसांची चाणक्यगिरी; तिघांचे भांडण एकाचा लाभ!!
- विधान परिषद : महाविकास आघाडीला फडणवीसांचा पुन्हा धोबीपछाड; काँग्रेसचे भाई जगताप पराभूत भाजपचे प्रसाद लाड विजयी!!