• Download App
    शिवसेनेला खिंडार : तेल लावून आले होते, पण खेळ बुद्धिबळाचा; भाजपचे शरसंधान!! Shivsena splits : BJP targets sharad Pawar and Uddhav Thackeray

    शिवसेनेला खिंडार : तेल लावून आले होते, पण खेळ बुद्धिबळाचा; भाजपचे शरसंधान!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झालेल्या पराभवानंतर आता सरकारमध्ये बहुमत शिल्लक नसल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असतानाच भाजप महाविकास आघाडीच्या पराभवावर बोचरी टीका करत आहे. Shivsena splits : BJP targets sharad Pawar and Uddhav Thackeray

    विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ कमी असून सुद्धा भाजपने आपले सर्व उमेदवार निवडून आणले. त्यामुळे यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. पहिलवान तेल लावून आले होते, पण खेळ बुद्धिबळाचा निघाला, असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

    – महाविकास आघाडीवर मात

    विधान परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने पुन्हा एकदा चमत्कार घडवून आणला. भाजपने आपले पाचही आमदार निवडून आणत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धूळ चारली. या निवडणुकीत भाजपच्या आमदारांचे संख्याबळ कमी होते, त्यामुळे ही निवडणूक जिंकणे हे भाजपसाठी अशक्य मानले जात होते. पण पुन्हा एकदा भाजपने अंकांचे गणित जुळवून आणत महाविकास आघाडीवर मात केली.

    – आखाड्याचा नाही, आकड्यांचा खेळ

    राज्यसभेनंतर या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अपक्षांसह 113 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपला या निवडणुकीत पहिल्या पसंतीची तब्बल 133 मते मिळाली. त्यामुळे हा आखाड्याचा नाही तर आकड्यांचा खेळ होता, असे भाजपने स्पष्ट केले आहे.

    Shivsena splits : BJP targets sharad Pawar and Uddhav Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस