• Download App
    शिवसेनेत फूट : ठाण्यातील सर्व 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी; ठाकरे गटाला दणका!!Shivsena splits : all 66 corporaters joins shinde faction in thane

    शिवसेनेत फूट : ठाण्यातील सर्व 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी; ठाकरे गटाला दणका!!

    प्रतिनिधी

    मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर, भाजपसोबत युती करुन मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाच, पण आता ठाकरे यांना आणखी एक धक्का देत ठाणे महापालिकेतील 66 नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. बुधवारी रात्री या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. Shivsena splits : all 66 corporaters joins shinde faction in thane

    याआधी ठाण्याचे महापौर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन करत, पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता नगरसेवकही शिंदे गटाकडे वळल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे.

    काही महिन्यांत निवडणूक

    ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक असून, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे ३४, भाजपकडे २३, काॅंग्रेसकडे ३ आणि एमआयएमकडे २ नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून, आधीच्या ठाकरे पवार सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. येत्या काही महिन्यांत ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे.

    Shivsena splits : all 66 corporaters joins shinde faction in thane

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस