• Download App
    गोव्यातील पक्षांतरावर अंकुश आणण्यासाठी शिवसेनेकडे योजना; संजय राऊत यांची माहितीShivsena Sanjay Raut Targeted BJP over Goa Politics

    गोव्यातील पक्षांतरावर अंकुश आणण्यासाठी शिवसेनेकडे योजना; संजय राऊत यांची माहिती

    वृत्तसंस्था

    पणजी : “एका तिकिटावर निवडून यायचे आणि नंतर निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात उडी मारायची हे थांबवावे लागेल”, पक्षांतर रोखण्यासाठी शिवसेनेकडे योजना आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
    Shivsena Sanjay Raut Targeted BJP over Goa Politics

    पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले की, युती आणि आघाडीचं गोव्यात आम्ही करणार नाही. आम्ही स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढविणार आहोत.



    उत्तर प्रदेशपाठोपाठ शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीतही उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी गोव्यातील राजकीय हालचालींवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. एका तिकिटावर निवडून यायचे आणि निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात सत्तेसाठी उडी मारणाऱ्याना गोव्यातील जनतेने रोखलं पाहिजे. पक्षांतर रोखण्याची योजना शिवसेनेकडे आहे. गोव्यात असे पक्षांतर किती दिवस चालणार? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

    दरम्यान, गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. कॅसिनोचा, जुगाराचा कहर झाला आहे. त्याविरोधात आंदोलन करून भाजप सत्तेवर आला. मात्र, त्या सगळ्याला भाजपचा पाठिंबा आहे. कोरोनात गोव्याची अवस्था वाईट झाली. ड्रग्स माफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजपा थापा मारत आहे. त्यासाठी शिवसेनेची सत्ता आणणे गरजेचे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    Shivsena Sanjay Raut Targeted BJP over Goa Politics

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस