• Download App
    शिवसेना खासदारांचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा; उद्धव ठाकरेंसाठी ठरेल का महाविकास आघाडीतून “एस्केप रूट”??Shivsena MPs support Drupadi Murmu for president Elections, will it provide escape root to Uddhav Thackeray from MVA

    शिवसेना खासदारांचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा; उद्धव ठाकरेंसाठी ठरेल का महाविकास आघाडीतून “एस्केप रूट”??

    शिवसेना खासदारांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत 19 पैकी 12 खासदार उपस्थित होते तर 7 खासदार अनुपस्थित होते. मात्र, या सर्व खासदारांचा एकच समान मुद्दा दिसतो आहे तो म्हणजे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा. तसे केल्यास शिवसेनेला आदिवासी राष्ट्रपती केल्यास राजकीय पुण्याचा लाभांश मिळू शकेल!!, असा शिवसेनेच्या खासदारांचा युक्तिवाद दिसतो. Shivsena MPs support Drupadi Murmu for president Elections, will it provide escape root to Uddhav Thackeray from MVA

    पण या मुद्द्याकडे सध्याच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या राजकीय अवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे यांच्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा हा एस्केप रूट ठरू शकतो!!

    शरद पवारांच्या पाठिंब्यावर यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. शिवसेनेतल्या खासदारांपैकी एकटे संजय राऊत हे यशवंत सिंहांना मतदान केले पाहिजे असे म्हणत होते. तशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. आपले मत खासदारांच्या बैठकीत कोणीच ऐकून घेतले नाही म्हणून प्रसार माध्यमांशी न बोलता संजय राऊत सामना कार्यालयाकडे निघून गेल्याच्या बातम्या देखील मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. या बातम्यांमध्ये जर तथ्यांश असेल तर शिवसेनेचे बहुसंख्या आमदार जसे संजय राऊत यांच्यावर नाराज आहेत तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त नाराजी शिवसेनेच्या खासदारांची दिसून येत आहे. जर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला तर शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी तो सत्तेबाहेर जाऊन संदर्भहीन बनलेल्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा “एस्केप रूट” ठरू शकतो.


    विरोधकांचे राष्ट्रपति पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा आज भरणार उमेदवारी अर्ज, विरोधी पक्षांचे हे दिग्गज नेते राहणार उपस्थित


    मात्र उद्धव ठाकरे यासंदर्भातला निर्णय दोन दिवसांनी घेणार असल्याचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी खासदारांना अपेक्षित निर्णय घेतला तर शिवसेनेला डॅमेज कंट्रोल साठी सर्वाधिक मोठे हत्यार मिळेल. एकनाथ शिंदे गटाकडून होणाऱ्या चतुराईच्या हल्ल्याची धार बोथट करता येईल. कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदे गटाला बॅकफूटवर ढकलता येऊ शकेल. अशा स्थितीत जर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचे ऐकण्यापेक्षा आपल्या बाकीच्या खासदारांचा केवळ “आतलाच” नव्हे, तर उघड आवाज ऐकला तरी भरपूर काम भागण्यासारखे आहे.

    उद्धवजींचा राजकीय प्रवास लालूजींच्या दिशेने

    मुंबईतल्या राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे यांचा राजकीय दृष्ट्या लालूप्रसाद यादव होण्याची कुजबुज ऐकू येते आहे. चारा घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले पण लालूप्रसाद यादव सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांना चारा घोटाळ्यात विविध न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागले. तुरुंगवास घडला. एका दीर्घकालीन चक्रात ते अडकले आणि अखेरीस राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. या अर्थाने दीर्घकालीन राजकारणात उद्धव ठाकरे यांचा राजकीय दृष्ट्या लालूप्रसाद यादव होऊ शकतो. (येथे उद्धव ठाकरे यांची तब्येत आणि लागू असावे यांची तब्येत यांचा काहीही संबंध नाही.)

    – कायदेशीर माहिती घेतली जातेय

    उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील विविध निर्णयांच्या छाननी बरोबरच वैयक्तिक पातळीवरच्या बऱ्याचशा व्यवहारांची कायदेशीरदृष्ट्या तपशीलवार माहिती घेतली जात असल्याच्या मंत्रालय वर्तुळात चर्चा आहेत या चर्चांमध्ये काही टक्क्यांमध्ये तथ्य असले तरी शिवसेनेचा सध्याचे सध्याचे डॅमेज बरे, पण नंतर मात्र कंट्रोल करणे ही अवघड जाईल, अशी कुजबुज राजकीय वर्तुळातून सुरू आहे!!

    – राऊत विरुद्ध सगळे खासदार

    अशा स्थितीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी राष्ट्रपती या मुद्द्यावर पाठिंबा दिला तर राजकीय दृष्ट्या बऱ्याच गोष्टी सुकर होण्याची शक्यता आहे. (खात्री नाही. कारण द्रौपदी मुर्मू यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या मतांची गरज नाही.) त्यामुळे उद्धव ठाकरे आता संजय राऊत यांचे म्हणणे (नेहमीप्रमाणे) ऐकतात की मातोश्री वरच्या बैठकीत बाकीच्या सर्व खासदारांचा उघडपणे ऐकू आलेला आवाज ऐकतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

    Shivsena MPs support Drupadi Murmu for president Elections, will it provide escape root to Uddhav Thackeray from MVA

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य