• Download App
    बाप गेला तर पोरगा बोकांडी बसेल या भीतीने गद्दारी झाली; खासदार संजय जाधवांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर!! Shivsena mp Sanjay Jadhav targets Uddhav Thackeray and eknath shinde at once over Shivsena split

    बाप गेला तर पोरगा बोकांडी बसेल या भीतीने गद्दारी झाली; खासदार संजय जाधवांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर!!

    प्रतिनिधी

    परभणी : ठाकरे गटविरुद्ध शिंदे गट रोजचे शाब्दिक युद्ध जसेच्या तसे नव्हे तर जास्त जोराने सुरू आहे. त्यातच आता खुद्द ठाकरे गटात देखील अस्वस्थता असल्याचे बाहेर आले आहे. Shivsena mp Sanjay Jadhav targets Uddhav Thackeray and eknath shinde at once over Shivsena split

    परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला आहे. एकतर उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होते. ते झाले तर त्यांनी मुलाला म्हणजे आदित्यला मंत्री करायला नको होते. दोघांनी खुर्च्या अडकवल्या त्यामुळे गद्दारी झाली आणि बाप गेला तर मुलगा बोकांडी बसेल ही चोरांना भीती वाटली, अशा शब्दांमध्ये संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांना एकाच वेळी टोले हाणले आहेत.



    शिवसेनेच्या बंडाळीवर भाष्य करताना संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंचे पक्ष संघटनेकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचाही आरोप केला. अडीच वर्षे सगळे नेते आणि कार्यकर्ते सांगत होते, संघटनेकडे लक्ष द्या. कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना बळ द्या. पण उद्धव ठाकरे यांना ते जमले नाही. त्यांनी संघटनेकडे पुरेसे लक्ष दिले नाही. ते स्वतः मुख्यमंत्री झाले.

    मुलगा आदित्यलाही मंत्री केले. त्यामुळे सगळ्यांना भीती वाटली बाप गेला, तर मुलगा बोकांडी बसेल, त्यापेक्षा आपली वेगळी चूल मांडलेली बरी असे सगळ्यांना वाटले आणि म्हणूनच ही बंडखोरी झाली. चोरांना संधी मिळाली, अशा शब्दांमध्ये संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना जोरदार टोले हाणून घेतले.

    Shivsena mp Sanjay Jadhav targets Uddhav Thackeray and eknath shinde at once over Shivsena split

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस